kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पुण्यात पूर येऊ नये म्हणून आदित्य ठाकरेंनी सांगितला उपाय

शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. नुकतंच आलेल्या पुरामुळे पुण्यातील एकतानगरमध्ये नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं. या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरेंनी एकतानगरमध्ये जात नुकसानीची पाहणी केली. नदी सुधार प्रकल्पाचीही आदित्य ठाकरेंनी माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पुन्हा पूर न येण्यासाठीच्या उपायांवर आदित्य ठाकरे बोलले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील कामांवरही आदित्य ठाकरेंनी भाष्य केलं. पुण्यात पूर येऊ द्यायचा नसेल तर नदी सुधार प्रकल्पाला स्थगिती दिली पाहिजे, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.

माविआ सरकारने पुण्यातील नदी सुधार प्रकल्पाला स्थगिती दिली होती,यावर उपाय एकच आहे. आता या नदी सुधार प्रकल्पाला स्थगिती दिली पाहिजे. कारण यातील अनेक गोष्टी बघितल्या नाहीत. त्यात द्रुरुस्थी सागितली होती. आता घरात पाणी येत आहे. या कामामुळे दुसऱ्या राज्यातील लोकांचा विकास या नदी सुधार प्रकल्पामध्ये दडला आहे का? हे पाहायला हवं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

राजकीय नेता म्हणून नाही तर नागरिक म्हणून बोलतोय. राजकारण बाजूला ठेवून यावर अभ्यास करायला हवा. सगळे राजकीय लोकांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. मात्र अनेक काम नदी पात्रात सुरू असतात किंवा राडारोडा असतो. या सरकारने अंधेरी पंपिंग स्टेशन कामाला स्थगिती दिली आहे. दोन पाच वर्षात पाऊस प्रमाण वाढलं आहे. पूरस्थिती वर लक्ष ठेवून काम करण्यासाठी कोणी तरी पहिला पाहिजे. यात पालकमंत्री पण असतात, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

पर्यावरण मंत्री असताना मी पुण्याबाबत एक बैठक घेतली होती,त्यावेळी पर्यावरण प्रेमी सोबत एक बैठक घेतली होती. रेड लाईन आणि ब्लू लाईन काही बांधकामासाठी बदलण्यात आलेल्या आहेत. हे भयानक समोर आहे. नदी पात्रात बांधकाम केलं आहे. याला उपाय काय? मी मंत्री असताना नदी सुधार प्रकल्प कामाला स्थगिती दिली होती. आताच्या पुरात मोठं नुकसान झालं आहे. अभ्यास करून सगळ केलं पाहिजे, असंही आदित्य ठाकरेंनी सुचवलं आहे.