Breaking News

तीन वर्षांपेक्षा अधिक काळ बदली न झालेल्या पदावरून बदली न झालेल्या अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी पदावरून नियुक्ती रद्द करण्याबाबत ॲड.अमोल मातेले यांची मागणी

मुख्य निवडणूक आयोग भारत यांनी नुकत्याच मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत तीन वर्षापेक्षा अधिक काळ पदावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येतील आणि त्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार नाही असे जाहीर केले आहे. तथापि महाराष्ट्र राज्यात अनेक महसूल अधिकारी तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून अनेक महसूल अधिकाऱ्यांच्या तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून बदल्या झालेल्या नाही. असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी केला आहे.

आज त्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाल्याचे आढळून आले आहे तरी तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच पदावर असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्ती रद्द करून तात्काळ बदल्या करण्यात याव्यात यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ॲड.अमोल मातेले यांनी राज्य निवडणूक आयुक्त, यांना ई-मेल द्वारे पत्र पाठवून मागणी केली आहे.