देशाच्या राजकारणात वाऱ्याच्या वेगासह घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुकीआधीच काँग्रेसला एक एक मोठे धक्के बसत आहेत. महाराष्ट्रानंतर आता मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री कमलनाथही भाजपच्या वाटेवर असल्याची चित्र गडद होत आहे. तरीही काँग्रेस नेतृत्वाकडून कमलनाथ यांच्याशी कोणताही संपर्क करण्यात साधण्यात आला नाही. त्यामुळे आता हे ही चित्र स्पष्ट झाले आहे की, ते जरी भाजपमध्ये जाणार असले तरी त्यांना थांबवण्यासाठी अजून कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत हे ही स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्यासह त्यांचा मुलगा नकुलनाथही आता भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ दिल्लीला पोहोचल्यानंतर त्यांनी त्यांनी काँग्रेस सोडण्याबाबत आपलं मौन सोडले. काँग्रेस सोडण्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, असा काही प्रकार घडला तर त्याची माहिती आपण स्वतः देऊ असं त्यांनी सांगितले.