भांडुपचा भोंगा आज दिल्लीवरून कर्णकर्कश आवाजात एखाद्या मानसिक रोग्यासारखा वाजला मात्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्याबद्दल त्याने तारतम्य बाळगून बोलावे नाहीतर ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये एक बेड भविष्यात बुक करु असा सज्जड दम राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी संजय राऊत यांना दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी गुरुवारी वक्फ बोर्डाच्या विधेयकावर भाषण करताना शिवसेनेचे जाज्वल्य हिंदूत्व जे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात होते याची आठवण करून दिली आणि त्या भाषणाच्या मिरच्या इतक्या झोंबल्या की, आज हा भोंगा दिल्लीवरून कर्कश आणि खालच्या पातळीवर येऊन वाजला असेही आनंद परांजपे म्हणाले.
शिवसेनेचे हिंदूत्व हे ‘गर्व से कहो हम हिंदू है…’ आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळी माझ्या शिवसैनिकांनी मशीद पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे असे वक्तव्य केले होते आणि ज्यावेळी ९२-९३ मध्ये दंगली झाल्या त्यावेळी शिवसेनेच्या असलेल्या सहभागाबद्दल आठवण करून दिल्यानंतर केवळ आताची शिवसेना जी संजय राऊत यांनी कॉंग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या चरणी अर्पण केली आहे.
ज्या प्रकारच्या शब्दांचा त्यांनी प्रयोग केला ते शब्द आम्ही बोलू शकतो मग संजय राऊत यांना कॉंग्रेसचे सर्टीफाईड ‘डॅशडॅशडॅश’ किंवा सिल्व्हर ओकचे सर्टीफाईड ‘डॅशडॅशडॅश’ हे आम्ही देखील बोलू शकतो. परंतु आमच्यावर ते संस्कार नाहीत. लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल ज्या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये दोन्ही सभागृहात शिवसेनेची भाषणे झाली परंतु ही निराशेच्या व पराभवाच्या वैफल्यातून झाल्याचे सांगतानाच रोज पक्ष सोडून जे शिवसैनिक जात आहेत त्यांचा उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास कमी होतो आहे तो अधिक बळकट कसा होईल याचा संजय राऊत यांनी विचार केला तर ते अधिक योग्य राहील असा टोलाही आनंद परांजपे यांनी लगावला.
पत्राचाळीची लॉटरी निघत आहे आणि ज्यांना या आरोपात ईडीची ८-९ महिने जेलवारी झाली आहे त्या संजय राऊत यांनी बोलताना तारतम्य बाळगावे. आरोप करणे खूप सोपे आहे. खासदार प्रफुल पटेल यांची साधी चौकशीही कधी लागली नाही. स्वतः संजय राऊत हे ईडीच्या जेलची वारी करुन आले आहेत. सध्या ते जामीनावर आहेत. त्यांनी उगाच वायफळ आरोप करु नये असा इशाराही आनंद परांजपे यांनी दिला.
Leave a Reply