आज विजयादशमी ! आजचा मुहूर्त हा शुभकार्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. याचेच औचित्य साधून अभिनेते सुबोध भावे यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटाचे नाव ‘संगीत मानापमान’ असून नावावरूनच हा एक संगीतमय सिनेमा असल्याचे लक्षात येते. विशेष म्हणजे हा राजेशाही काळातील चित्रपट आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सुबोध भावेंनी त्यांच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगितले.

या चित्रपटात सुबोध भावेंसोबत अभिनेते सुमित राघवन आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सुबोध भावेंनी सोशल मीडियावर एक छोटी व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये तो स्वतः एका सरदाराच्या भूमिकेत दिसतोय. तर अभिनेता सुमित राघवन हे राजाच्या भूमिकेत पाहायला मिळत असून अभिनेत्री वैदेही परशुरामी गायिका असल्याचे दिसते.

सुबोध भावे यांनी एक व्हिडिओ क्लिप शेअर करून त्यापुढे कॅप्शन लिहिले की, विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर संगीत चित्रपटाच्या ऐतिहासिक अध्यायाचा आरंभ! एक भव्य दिव्य संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान!” १० जानेवारीपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात! आपणा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *