Breaking News

“बारामतीची लढाई सोपी राहिलेली नाही” ; संजय राऊतांचं अजित पवारांना आव्हान

राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एक अटीतटीची लढत म्हणजे पवारांच्या बारामतीतील… बारामतीत यंदा अजित पवार विरूद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे निवडणूक लढत आहेत. या लढतीकडे सर्वाचंच लक्ष आहे. अजित पवार सध्या गावभेटी घेत आहेत. गावागावात जात अजित पवार प्रचार करत आहेत. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. बारामतीची लढाई आता सोपी राहिलेली नाही, असं संजय राऊत म्हणालेत.

संजय राऊत म्हणाले की, 26 नोव्हेंबरला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालेलं आपण पाहाल. त्यामुळे कोण- काय बोलतं? कुणाचे काय दावे आहेत? याला काही महत्व नाही. त्यांना म्हणावं आधी आपण जिंकून या… अजित पवारांसह सगळ्यांना माझं सांगणं आहे की आधी आपण जिंकून या… बारामतीची लढाई आता सोपी राहिलेली नाही. यंदाच्या निवडणुकीत अजित पवार हे किंगमेकर ठरतील, असं विधान अजित पवार गटाचे शिवाजीनदर मानखुर्द विधानसभेचे उमेदवार नवाब मलिक यांनी केलं. त्यावर संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. निकाल लागल्यावर कळेल कोण किंगमेकर आणि कोण किंग आहे ते… उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच सरकार येईल. या राज्यामध्ये 26 तारखेला महाविकास आघाडीच सरकार स्थापन झालेलं आपण पहाल. कोण काय बोलताय कोणाचे काय दावे आहेत हे आता कशाकरता? आधी जिंकून या, अजित पवार यांच्यासह आधी सर्व जिंकून या. बारामतीची निवडणूक आता सोपी राहिलेली नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रचारसभेवर संजय राऊतांनी टीका केली आहे. ते भाजपचेच मुख्यमंत्री आहेत… एकनाथ शिंदे यांना भाजपच्या पालख्या वाहाव्या लागणार आहेत त्यात नवीन काय आहे. ज्या पक्षाचे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत. त्यांना भाजपच्या चपला उचलाव्या लागत आहेत, असंही संजय राऊत म्हणालेत.