भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचा आज वाढदिवस आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी त्यांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या सर्वत्र याची चर्चा होत असून सोशल मीडियावरील ही पोस्ट व्हायरल झाली आहे. काय आहे अयोध्या पोळ यांची पोस्ट जाणून घेऊया
काय आहे अयोध्या पोळ यांची पोस्ट ?
आदरणीय उद्धवजी साहेब व “संजय राठोड”च्या नावे छातीचा पिंजरा फुटून बाहेर पडेल इतका आवाज उठवणाऱ्या आणि विधान परिषद मिळाल्यावर महिलांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे बंद केलेल्या #लाडक्या चित्राताई यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो आणि पुन्हा एकदा “संजय राठोड”वर आवाज उठवण्याचे बळ देवो हीच प्रार्थना..💐🎂