महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अशातच, भाजपला मुंबईतील पहिली बंडखोरी थांबवण्यात यश आले आहे. माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी बोरिवली विधानसभा मतदारसंघातून माघार घेतली आहे. भाजप नेते विनोद तावडेंनी गोपाळ शेट्टींची समजूत काढली. त्यामुळे गोपाळ शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात येत्या 20 तारखेला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. 2019 नंतर राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षात फूट पडल्यानंतर आता कोणता पक्ष बाजी मारणार ? राज्यात महायुतीचे की महागाईदचे सरकार येणार ? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागले आहे.
2019 मधील पक्षीय बलाबल काय होते ?
भाजप – 105 शिवसेना – 56 राष्ट्रवादी – 54 काँग्रेस – 44 बहुजन विकास आघाडी – 03 प्रहार जनशक्ती – 02 एमआयएम – 02 समाजवादी पक्ष – 02 मनसे – 01 माकप – 01 जनसुराज्य शक्ती – 01 क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01 शेकाप – 01 रासप – 01 स्वाभिमानी – 01 अपक्ष – 13 एकूण – 288