भारतानं पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एअर स्ट्राईक केल्यानंतर त्यासंदर्भात महाराष्ट्रातूनही अभिनंदनपर प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. या कारवाईत महाराष्ट्रातील सत्ताधारी व विरोधकही सरकारच्या पाठीशी उभे राहिले. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी युद्ध हे दहशतवादावर उत्तर नसतं, अशी भूमिका घेतल्यानंतर त्यावरून चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली? यासंदर्भात सध्या तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्यामुळे राजकीय अंदाज बांधले जात आहेत.
Leave a Reply