आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी अखेर रद्द झाली आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी झालेल्या कारवाईनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे.
दोन दिवसांआधी नागपूरच्या सत्र न्यायालयाने त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दोन वर्षांपेक्षा जास्तकाळाची शिक्षा सुनावली गेली. तर त्या विधिमंडळ सदस्याला आमदारपदी राहता येत नाही. त्याच नुसार सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे.