Breaking News

मोठी बातमी ! वाल्मिक कराडसोबत फोटो काढणं आलं अंगलट; जितेंद्र आव्हाडांच्या अक्षेपानंतर API महेश विघ्नेंची उचलबांगडी

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी महायुती सरकारने 10 जणांचे विशेष तपास पथक (एसआयटी) तयार केले होते. मात्र, या एसआयटीमधील पोलिसांच्या विश्वासर्हतेवरच शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यात एसआयटी पथकाचे प्रमुख IPS डॉ.बसवराज तेली यांचा अपवाद वगळता इतर सर्व पोलीस अधिकारी हे वाल्मिक कराडचे पोलीस आहेत, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून केला. जितेंद्र आव्हाड यांच्या अक्षेपानंतर एपीआय महेश विघ्ने यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

एपीआय महेश विघ्ने यांच्यासह इतर दोघांना एसआयटीतून बाजूला करण्यात आले आहे. संतोष देशमुख प्रकरणातील सूत्रधार असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराड सोबत महेश विघ्ने यांचा फोटो वायरल झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी महेश विघ्ने यांच्या बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. परिणामी या मागणीची दखल लक्षात एपीआय महेश विघ्ने यांच्यासह हवलादार मनोज वाघ यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे तिन्ही कर्मचारी बीड स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी आहेत. एसआयटी मध्ये यांचा समावेश झाल्यानंतर सुद्धा बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना रिलीव्ह केलेले नव्हते. याचाच अर्थ हे तिघेजण आता एसआयटीचा भाग असणार नाहीत. दुसरीकडे याच मुद्यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी आरोपीच्या कोणी जवळचा SIT मध्ये असेल तर त्याला तत्काळ दूर करा, अशी मागणी केली होती. या प्रकरणात कोणी राजकारण करू नका, त्यांना विनंती आहे आपली भूमिका हीच असली पाहिजे की त्यांना न्याय मिळायला हवा, राजकारण करू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केलं होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *