आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांना धमकीचे पत्र आले आहे. हे पत्र आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. नवनीत राणा यांना आलेल्या धमकीच्या पत्रात सामूहिक अत्याचाराची तसेच घरासमोर गाय कापण्याची धमकी देण्यात आली आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, नवनीत राणा यांना आमिर नावाच्या एका व्यक्तीने धमकीचे पत्र पाठवले आहे. या पत्रातून धमकी देणाऱ्याने राणा यांना सामूहिक अत्याचाराची त्याच बरोबर घरासमोर गाय कापणार असल्याचे म्हटले आहे. धमकी देणाऱ्याने पत्रातून १० कोटी रुपयांची खंडणी देखील मागितली आहे. खंडणी दिली तरच आपण पिछा सोडू असा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.

पत्रातून नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांच्याबद्दल वादग्रस्त शब्दांचा वापर केला आहे. धमकी देणाऱ्याने पत्रात आपण हैदराबादचा असून कोणत्याही पक्षाचा नसल्याचे म्हटले आहे. माझा भाऊ वसीमने तुम्हाला दुबईतून फोन केला होता. मात्र तुम्ही त्याचा फोन उचलला नसल्याचे पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे या पत्रात फोन नंबर देखील देण्यात आला आहे. पत्राच्या शेवटी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा लिहल्या आहेत.

हे पत्र आपण आपल्या पत्नीच्या हाताने लिहल्याचे उल्लेख करण्यात आला आहे. याप्रकरणी नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी राजापेठ पोलिसांत तक्रार दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *