भारतातील सर्वात मोठा गायन रियालिटी शो इंडियन आयडॉल आपला 15 वा बहुप्रतीक्षित सीझन घेऊन सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर येत आहे! ऑडिशन सुरू झाल्या आहेत आणि या मंचावर येण्याची आणि इथे येऊन आणखी मोठा गायक बनून पुढे जाण्याची संधी मिळवण्यासाठी उमेदवारांना कसून प्रयत्न करावा लागणार आहे. असामान्य आवाज आणि त्या कलाकारांच्या यशमागची कथा यांचा शोध घेण्यासाठी या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर आहेत- लोकप्रिय रॅपर बादशाह, गोड गळ्याची गायिका श्रेया घोषाल आणि प्रसिद्ध गायक आणि संगीतकार विशाल ददलानी. ते तिघे मिळून भारताच्या आगामी इंडियन आयडॉलचा शोध घेत आहेत.
काही उठून दिसणाऱ्या उमेदवारांमध्ये एक आहे भुवनेश्वरचा ईप्सित पाटी, जो एक ट्रॅव्हल व्लॉगर आहे शिव भक्त आहे. ईप्सितने भुवनेश्वर ते त्र्यंबकेश्वर ही साहसयात्रा सुरू केली होती आणि त्यानंतर ऑडिशनसाठी तो मुंबईला आला. त्याच्या परफॉर्मन्सच्या अगोदर हलक्या-फुलक्या गप्पा मारताना विशाल ददलानी आणि त्याची बाइकिंगची आवड समान असल्याचे त्या दोघांच्या लक्षात आले. विशालला आपले सुरुवातीचे बाइकिंगचे दिवस आठवले, तर ईप्सितने सांगितले की, त्याचा व्लॉग, त्याच्या आध्यात्मिक यात्रेचे टिपण अपूर्ण आहे आणि त्याला अंतिम अध्यायाची प्रतीक्षा आहे.
ईप्सितने जेव्हा ‘कबीर सिंह’ चित्रपटातील ‘कैसे हुआ’ गाणे म्हटले तेव्हा त्याचे गायन कौशल्य पाहून परीक्षक अवाक झाले. त्याच्या परफॉर्मन्सने, त्याच्या भावनापूर्ण आवाजाने ती जागा भारून गेली.
बादशाह तर फारच प्रभावित झाला. तो म्हणाला, “जेव्हा तू हे गीत गाईलास, तेव्हा असे वाटले की हे तुझेच गाणे आहे. ते तू पूर्ण तुझे बनवले आहेस. हे माझे एक आवडते गाणे आहे. तू ते खूप छान सादर केलेस.” मजेत तो पुढे म्हणाला, “कहने को है बाइकर, लेकिन है सुरों का स्ट्राइकर.”
श्रेया घोषालने देखील त्याचे कौतुक करताना कबूल केले, “मला वाटले होते तू प्रामुख्याने एक साहसी व्यक्ती आहेस आणि संगीत तुझा दुय्यम छंद आहे. पण तुझा आवाज हीच तुझी खरी ओळख आहे. या गाण्यात तू अगदी तद्रूप झालास आणि प्रत्येक सुरातून ती भावना व्यक्त झाली. तू कोणत्याही नायकाचा आवाज नाहीस, तुझा आवाजाच खरा नायक आहे.”
विशाल ददलानीने त्याला सर्वात मोठी दाद दिली. तो म्हणाला, “मी सुद्धा बाइकर होतो. त्यामुळे आता मला वाटते आहे की, यापुढे तू बाइक टूर करणार नाहीस, तर त्याऐवजी गाण्याच्या टूर करशील! तुझा आवाज थेट हृदयाला भिडतो. ‘कैसे हुआ’ गाणे तू खरोखर आपलेसे केलेस. मला वाटते, तुझ्यासोबत बाइक ट्रिप करण्याचे माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला इंडियन आयडॉल संपण्याची वाट बघावी लागणार!”
लिंक: https://www.instagram.com/p/DAsUNlwAJO7/?hl=en
एक अनोखा प्रवास आणि असामान्य परफॉर्मन्स यामुळे ईप्सितच्या कहाणीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या ऑडिशनमध्ये गोल्डन तिकीट मिळवून आपल्या व्लॉगचे समापन तो या यशासह करू शकेल का?
ईप्सित पाटीसारख्या असामान्य प्रतिभावंतांना जगासमोर घेऊन येणाऱ्या इंडियन आयडॉल 15 च्या ऑडिशन अवश्य बघा