Breaking News

पण महाराष्ट्राची इच्छा फलद्रूप करणे हे आपल्या आकांच्या हातात आहे..!” ; सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ विरोधी पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनं सुरू केली आहेत. या हत्येप्रकरणामुळे धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात अडकले असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी वारंवार केली जात आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यानेच देशमुख यांच्या हत्येचा कट रचला, असा आरोप केला जात आहे. वाल्मिक कराड यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांची चौकशी सुरु आहे. आता या प्रकरणावरुन शिवसेना ठाकरे गटाने हल्लाबोल केला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे. धस साहेब आपला लढा यशस्वी व्हावा हीच महाराष्ट्राची सदिच्छा आहे. पण महाराष्ट्राची इच्छा फलद्रूप करणे हे आपल्या आकांच्या हातात आहे..!, असे सुषमा अंधारेंनी म्हटले आहे.

काय आहे सुषमा अंधारेंचं ट्वीट ?

“सन्मा. धससाहेब, पिकविमा, मल्टीस्टेट बँकघोटाळे, खून अपहरण खंडणी यात गुन्हेगार, आका आणि आकांचे आका यांना शिक्षा होण्यासाठी आपण जंग जंग पछाडताय. आपला लढा यशस्वी व्हावा हीच महाराष्ट्राची सदिच्छा आहे. पण महाराष्ट्राची इच्छा फलद्रूप करणे हे आपल्या आकांच्या हातात आहे..!”, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

सुषमा अंधारे यांच्या या पोस्टनंतर आता अनेकजण आका आणि आकांचे आका कोण, असा प्रश्न विचारत आहेत. तसेच त्यांच्या पोस्टनंतर सुरेश धस यांचे आका कोण, असाही प्रश्न उपस्थितीत होत आहे. मात्र अद्याप यावर कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *