लवकरच विधानसभा निवडणुकांचं बागुल वाजणार आहे. अशातच काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीचं गणित मांडलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आज महाराष्ट्रात येत आहेत. नांदेड आणि कोल्हापूरमध्ये राहुल गांधी यांचा दौरा आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांनी विधानसभा निवडणुकीचं गणित मांडलं आहे. महत्वाच्या मतदारसंघांवर काँग्रेसने दावा केला आहे.
पुणे शहर काँग्रेसने पुणे शहरातील पाच विधानसभा मतदारसंघाची पक्षाकडे मागणी केली आहे. काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीत मागणी केली आहे. काँग्रेसकडे याधीच शहरातील तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये कसबा, शिवाजीनगर आणि कॅन्टोन्मेंट या मतदारसंघाचा समावेश आहे. मात्र हडपसर आणि पर्वती हे दोन्ही राष्ट्रवादीचे मतदारसंघही काँग्रेसकडे घेण्याची शहर काँग्रेस नेत्यांची मागणी आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याकडे ही मागणी केली आहे.