kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर !

भारतीय चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. मृगया, डिस्को डान्सर, अग्निपथ, गुरु यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमधून विविध भूमिका करणाऱ्या मिथुन यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या १७ व्या सोहळ्यात ८ ऑक्टोबर रोजी अभिनेते मिथुन चक्रवर्तींना सन्मानित करण्यात येणार आहे.

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना मिठुनदा असंही संबोधण्यात येतं. आत्तापर्यंत मिथुन चक्रवर्ती यांनी शेकडो चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विविध पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. तसंच तीन चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. आता चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कार या पुरस्काराने मिथुन चक्रवर्ती यांना गौरवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ही घोषणा जारी केली आहे . मिठुनदा यांचा उल्लेखनीय सिनेमॅटिक प्रवास पिढ्यांना प्रेरणा देतो! दादासाहेब फाळके निवड ज्युरीने दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती जी भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या महान योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

१९७६ मध्ये प्रदर्शित झालेल्या मृगया या त्यांच्या पहिल्या चित्रपटाने अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना व्यापक ओळख मिळाली . ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता . १९८२ मध्ये आलेल्या डिस्को डान्सर या चित्रपटाने मिथुन चक्रवर्ती यांना देशभर प्रसिद्धी मिळाली. १०० कोटी क्लबमध्ये गेलेला हा हिंदी सिनेसृष्टीतला पहिला चित्रपट आहे.

दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान आहे . माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारे दरवर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये हा पुरस्कार दिला जातो . भारतीय चित्रपट सृष्टीची वाढ आणि विकासासाठी अपवादात्मक आणि उत्कृष्ट योगदानासाठी चित्रपट व्यवसायातील उत्तम कलाकारांना सुवर्णकमळ व एक कोटी रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे .