सोशल मिडीयावर सेलिब्रिटी पोस्ट शेअर करत असतात. कधी त्या वैयक्तिक बाबींच्या असतात तर कधी त्यांच्या कामाबद्दलच्या. . ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले हे देखील सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत असतात. पण सध्या त्यांच्या पोस्ट पेक्षा त्यांची कॉमेंट जास्त चर्चेत आहे.

नेमकं काय घडलंय ?

‘गेला माधव कुणीकडे’ हे नाटक आता पुन्हा रंगभूमीवर येणार असून काही ठराविकच प्रयोग या नाटकाचे होणार आहेत. त्याची माहिती प्रशांत दामले हे त्यांच्या सोशल मीडियावरुन देत असतात. पण सध्या सोशल मीडियावर या नाटकापेक्षा एका कमेंटची जोरदार चर्चा सुरु आहे. प्रशांत दामले यांनी पोस्ट केलेल्या या प्रयोगाच्या माहितीवर एकाने कमेंट करत चक्क दामलेंना निवृत्त होण्याचा सल्ला दिला आहे. त्यावर प्रशांत दामलेंनी देखील जशास तसं उत्तर त्याला दिलं आहे.

प्रशांत दामले यांनी केलेल्या एका पोस्टवर एकाने त्यांना निवृत्त होण्याचा सल्ला दिला. त्यावर दामलेंनी उत्तर देत म्हटलं की, रसिक प्रेक्षक बोलत नाहीत हे खर आहे.पण त्यांच्या मेसेज वरून कळत कि कधी थांबायचे ते. मला अंदाज येतो. सल्ल्याबद्दल धन्यवाद. दामलेंच्या उत्तरावर पुढे कोणत्याही प्रकारची कमेंट आली नाही. त्यामुळे रसिक प्रेक्षकांचा आदर करत योग्य त्या शब्दांत दामलेंनी ट्रोल करणाऱ्यांना खडेबोल सुनावले.

नाट्यसृष्टीमधलं प्रशांत दामले हे एक नावाजलेलं व्यक्तीमत्त्वं. त्यांच्या नावावर 12000 प्रयोगांचा रेकॉर्ड देखील आहे. तरीही दामले हे आजही प्रेक्षकांच्या तितकेच पसंतीस उतरतात.