kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

“शरीरामुळे ट्रोल झालेल्या सर्व महिलांसाठी” ; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची पोस्ट चर्चेत

मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या कामामुळे , आणि पोस्टमुळे चर्चेत असते. नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली आहे. आकाशी रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये सोनालीचं सौंदर्य अगदी खुलून दिसतंय. अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांना भुरळ पाडली आहे. अनेकांनी तिच्या या ग्लॅमरस लूकसाठी तिचं कौतुक केलंय. पण या पोस्टमध्ये लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे फोटोला दिलेलं कॅप्शन.

काय आहे पोस्ट ?

“शरीरामुळे ट्रोल झालेल्या सर्व महिलांसाठी – जाड किंवा बारीक असणं ही तुमची निवड आहे. आपल्या शरीरावर प्रेम करणं हा आपला अधिकार आहे. मत मांडणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा. तुमच्या आनंदाला प्राधान्य द्या.” असं जबरदस्त कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोला दिलं आहे. “ट्रोल करनेवाले कभी डरते नाही” असंही सोनालीने यात लिहिलं आहे.

सोनालीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय. व्हायरल झालेली पोस्ट पाहताच चाहत्यांनी यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “तुमचं कॅप्शन वाचून मला आनंद झाला. तुम्ही सर्व ट्रोलर्सच्या कानशिलात लगावलीत.” असं कॅप्शन एका चाहतीने लिहिलं आहे. तर एका युजरने कमेंट करत लिहिलं, “उगाच तुम्हाला अप्सरा नाही म्हणत.”