भाजपला चार पैकी तीन राज्यांमध्ये कलांनुसार बहुमत मिळाले आहे. भाजपने मध्य प्रदेश, राजस्थानात मोठी मुसंडी मारली आहे.तीन राज्यातल्या विजयानंतर भाजप कार्यालयात सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी या विजयानंतर ट्वीट करत विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले आहे. एक अकेला सब पर भारी म्हणत हे मोदी मॅजिक असल्याचे स्मृती इराणी यांनी म्हटले आहे.

स्मृती इराणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी म्हणत आहे देश बघत आहे एक अकेला अनेकांना भारी पडत आहे. नरेंद्र मोदी यांचे हे भाषण लोकसभेतील आहे. हे भाषण जुने असून त्याचा व्हिडीओ आता शेअर करत विजयाचे श्रेय नरेंद्र मोदींना दिले आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये स्मृती इराणी यांनी म्हटले आहे की, देशात एकच गॅरंटी मिळते ती म्हणजे मोदी गॅरंटी आहे.