मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या श्रेयवादावरुन महायुतीतच चढाओढ सुरु असतानाच बारामतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा एक फ्लेक्स मोरगाव रस्त्यावरील एका होर्डिंगवर झळकला.

बारामतीत हा फ्लेक्स लावताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे, मात्र दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो फ्लेक्सवर वापरलेला नाही.

हा फ्लेक्स नेमका कोणी लावला याची स्पष्टता नसली तरी या योजनेमध्ये देवेंद्र फडणवीस यांचीही भूमिका महत्वाची आहे असाच संदेश यातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एकीकडे जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने अजित पवार राज्यभरात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा प्रसार व प्रचार करत आहेत.

ही योजना लोकप्रिय ठरत असल्याचे चित्र असतानाच बारामतीत अजित पवारांना वगळून देवेंद्र फडणवीस यांचा देवाभाऊ असा उल्लेख केलेला व नरेंद्र मोदी व एकनाथ शिंदेचा असलेला फोटो व अजित पवारांचा वगळलेला फोटो याची बारामतीत चर्चा होती.