विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ३८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये विद्यमान ३२ आमदारांना आणि नवीन ६ जणांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान उर्वरित उमेदवारांची यादी आज प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांना दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अर्जुनी मोरगाव, इगतपुरी, अमरावती शहर, नवापूर, पाथरी, मुंब्रा – कळवा याठिकाणी नवीन उमेदवार देण्यात आले आहेत. विद्यमान ३२ आमदारांमध्ये ९ मंत्र्यांचा समावेश आहे तर विधानसभा उपाध्यक्षांचा आणि चार महिला उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेली ३८ उमेदवारांची पहिली यादी खालीलप्रमाणे :
बारामती – अजित पवार,
येवला – छगन भुजबळ
आंबेगाव – दिलीप वळसे पाटील
कागल – हसन मुश्रीफ
परळी – धनंजय मुंडे
दिंडोरी – नरहरी झिरवाळ
अहेरी – धर्मरावबाबा आत्राम
श्रीवर्धन – आदिती तटकरे
अमळनेर – अनिल भाईदास पाटील
उदगीर – संजय बनसोडे
अर्जुनी – मोरगाव – राजकुमार बडोले
माजलगाव – प्रकाश सोळंके
वाई – मकरंद पाटील
सिन्नर – माणिकराव कोकाटे
खेड – आळंदी – दिलीप मोहिते
अहमदनगर शहर – संग्राम जगताप
इंदापूर – दत्तात्रय भरणे
अहमदपूर – बाबासाहेब पाटील
शहापूर – दौलत दरोडा
पिंपरी – अण्णा बनसोडे
कळवण – नितीन पवार
कोपरगाव – आशुतोष काळे
अकोले – डॉ. किरण लहामटे
वसमत – चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
चिपळूण – शेखर निकम
मावळ – सुनिल शेळके
जुन्नर – अतुल बेनके
मोहोळ – यशवंत माने
हडपसर – चेतन तुपे
देवळाली – सरोज अहिरे
चंदगड – राजेश पाटील
इगतपुरी – हिरामण खोसकर
तुमसर – राजू कारेमोरे
पुसद – इंद्रनील नाईक
अमरावती शहर – सुलभा खोडके
नवापूर – भरत गावित
पाथरी – निर्मला उत्तमराव विटेकर
मुंब्रा – कळवा – नजीब मुल्ला आदींचा समावेश आहे.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेश सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *