ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये १७ उमेदवारांची नावे आहेत. खासदार संजय राऊत यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी यादी तयार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार आज सकाळी नऊ वाजता उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. ते म्हणालेत की, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे.
यामध्ये औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. सांगलीतून चंद्रहार पाटील यांना संधी देण्यात आली आहे. रायगडमधून अनंत गीते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परभणीमधून संजय जाधव यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवण्यात आला आहे. सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या जागेवर काँग्रेसने दावा केला होता. पण, ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांचे नाव निश्चित केले आहे. त्यामुळे स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी असणार आहे.
वाचा उमेदवारांची संपूर्ण यादी
मतदारसंघ– उमेदवाराचे नाव
बुलढाणा- नरेंद्र खेडेकर
यवतमाळ-वाशिम- संजय देशमुख
मावळ- संजोग वाघेरे-पाटील
सांगली- चंद्रहार पाटील
हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर
संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
धाराशिव- ओमराजे निंबाळकर
शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे
नाशिक- राजाभाऊ वाजे
रायगड- अनंत गीते
सिंधुदुर्ग-रत्नागिरी- विनायक राऊत
ठाणे- राजन विचारे
मुंबई-ईशान्य- संजय दिना पाटील
मुंबई-दक्षिण- अरविंद सावंत
मुंबई वायव्य- अमोल कीर्तीकर
परभणी- संजय जाधव