kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

८ वर्षांचे मतभेद विसरून आरती सिंहच्या लग्नाला गेला अभिनेता गोविंदा

प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आणि अभिनेत्री आरती सिंह नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. आरतीने दीपक चौहानशी लग्न करत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. मोठ्या थाटामाटात आरतीचा विवाहसोहळा संपन्न झाला. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा आरती आणि कृष्णा अभिषेकचा मामा लागतो. पण, त्यांच्यात गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरू आहेत. त्यामुळे आरती सिंहच्या लग्नाला गोविंदा आणि त्याचे कुटुंबीय हजेरी लावतील का? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता.

कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मिरा शाहने मामा गोविंदा आरतीच्या लग्नाला आले तर आनंद होईल, असं म्हटलं होतं. गेल्या ८ वर्षांचे मतभेद विसरून गोविंदा भाचीच्या लग्नात हजर होता. आरती सिंहच्या लग्नातील गोविंदाचा व्हिडिओ समोर आला आहे. गोविंदाने आरती आणि दीपकला त्यांच्या नवीन आयुष्यासाठी आशीर्वाद दिले. गोविंदाला लग्नात आलेलं पाहून कृष्णा आणि कश्मिराही खूश होते.

आरती सिंह आणि दीपक चौहान यांनी कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत २५ एप्रिलला लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला कपिल शर्मा, अर्चना सिंह, पारस छाबड़ा, माहिरा शर्मा, तुषार कपूर, प्रियांका चहर चौधरी, अंकिता गुप्ता, शेफाली जरीवाला, देवोलिना भट्टाचार्जी या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.