kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

काणकोण नगरपालिकेतील विरोधी गटाच्या चौघांचा भाजपला पाठिंबा

काणकोण, नगरपालिका मंडळातील विरोधी गटाच्या चार नगरसेवकांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन आपला पाठिंबा व्यक्त केला.यावेळी माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तनावडे उपस्थित होते.

या चारजणांमध्‍ये नगरसेवकांमध्ये मास्तीमळ वार्डाचे धीरज नाईक गावकर, पाटणे वार्डाचे शुभम कोमरपंत, भगतवाडा वार्डाच्या नगरसेविकेचे पती माजी नगराध्यक्ष समीर देसाई, किंदळे वार्डाच्या नगरसेविकेचे पती शेखर देसाई यांचा समावेश आहे. हे सर्वजण लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला पूर्ण समर्थन देणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

याबाबत समीर देसाई यांनी संगितले की, माजी उपसभापती इजिदोर फर्नांडिस व माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांचे आम्‍ही समर्थक आहोत. त्यांनी भाजपमध्‍ये प्रवेश केला. मात्र गेल्या निवडणुकीत इजिदोर फर्नांडिस यांना भाजपची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती.

त्यावेळीही त्यांना समर्थन दिले होते. आता लोकसभा निवडणुकीत कवळेकर व फर्नांडिस ज्या उमेदवाराला समर्थन देणार आहेत, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू या निश्‍‍चयाने आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.