सांगली जिल्ह्य़ातील संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता नागरिकांना सावध राहण्याचे आहे आणि काळजी घेण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा सांगली जिल्ह्य़ाचे माजी पालकमंत्री जयंत पाटील यांनी नागरिकांना दिले आहे

नागरिकांना जिल्ह्यातील सध्याच्या पूरस्थितीची माहिती देताना जयंत पाटील म्हणाले की, सांगली जिल्ह्य़ातील नागरिकांना विशेषतः वारणा आणि कृष्णा नदीकाठच्या नागरिकांना विनंती आहे की त्यांनी घाबरून जाऊ नये. जिल्ह्यातील नद्यांची पातळी थोडीशी वाढली आहे. प्रशासनाने पाण्याचा विसर्ग कर्नाटकाकडे वाढवला तर नद्यांच्या पाण्याची पातळी कमी होईल. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करा असे ते म्हणाले.

पूरस्थिती असलेला भाग जर खाली केला जात असेल तर मागे राहण्याचे धाडस करू नका. आपल्या जनावरांना घेऊन सुरक्षित ठिकाणी पोहोचा. सर्व काही पावसावर अवलंबून आहे.  सर्वांनी काळजी घ्या. कार्यकर्ते, प्रशासन आपल्या सोबत आहे असे आवाहनही त्यांनी केले.