राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा काल निकाल लागला. यात राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यात भाजपचा विजय झाला. तर तेलंगणाची निवडणूक काँग्रेसने जिंकली. या निवडणुकांवरून महाराष्ट्रातील नेत्यांनी देखील भावना व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲड.अमोल मातेले यांनी देखील ट्विट करून मत मांडले आहे.

काय म्हणाले ॲड.अमोल मातेले ?

देशात नुकत्याच पार पडलेल्या चार राज्यांच्या निवडणुकांचा आश्चर्यकारक निकाल समोर आल्यानंतर इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीस संभ्रमाच आणि नैराश्यच वातावरण निर्माण झाले आहे.

मोदी-शहांसमोर जर तगड आवाहन उभे करायचे असेल तर आता इंडिया आघाडीकडे आदरणीय शरद पवार साहेबांशिवाय पर्याय नाही.आदरणीय पवारसाहेबांसारखा देशातील विविध विचारसरणीच्या राजकीय पक्षांना एकत्रित ठेवण्याची ताकद असेलेला आणि प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेला दुसरा नेता आजघडीला इंडिया आघाडीमध्ये दिसत नाही.त्यामुळे आता काँग्रेसने मोठे पण दाखवत इंडिया आघाडीचे प्रमुखपद आदरणीय पवारसाहेबांना दिले पाहिजे.