लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण तापू लागलं असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडू लागल्या आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडूनही एकमेकांवर आरोप होताना दिसत आहेत. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. ‘मी कुणाच्या नादी लागत नाही, कुणाचं वाईट चिंतत नाही, परंतु माझ्याशी विश्वासघात केला की त्यांचा सत्यनाश होतो’, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
अकलूज येथे जाहीर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

‘पवार साहेबांनी यांची सगळी दुकानदारी बंद केली होती. संस्था संपल्या होत्या, कारखाना बंद पडले होते. यावेळेस ही मंडळी आमच्याकडे आली. आम्ही विचार केला यांना मदत केली पाहिजे. त्यावेळेस आम्ही यांना जवळ केले कारखान्याला मदत केली. संस्थेला मदत केली. मी जे करतो ते मनाने करतो तुम्ही धन्यवाद दिले तरी करतो नाही दिले तरी करतो. तुम्ही जनतेच्या मनातून मोदीजींना काढू शकत नाही’, असे म्हणत असताना ते पुढे असेही म्हणाले की, पवार साहेबांना जे जमलं नाही ते रणजीत सिंह निंबाळकरांनी दहा वर्षात करून दाखवलं म्हणून पवार साहेबांच्या तुमच्यावर राग आहे.’