kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा अन् ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने; आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करत भाजपाची घोषणाबाजी!

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे बघायला मिळालं आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे राहत असलेल्या हॉटेलबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने ठाकरे गटाचे कार्यकर्तेही आक्रमक झाले. अखेर कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

याप्रकरणी आता पोलिसांनी दोन्ही पक्षातील काही कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलं आहे. महत्त्वाचे म्हणजे घटनेची माहिती मिळतात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घटनास्थळी पोहोचत भाजपा कार्यकर्त्यांच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसताच पोलिसांनी त्यांना थांबण्याची विनंती केली.