kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

इंडियाज बेस्ट डान्सर – सीझन 4 मध्ये करिश्मा कपूर सांगणार श्रद्धा कपूरच्या बालपणाची आठवण

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सर – सीझन 4 हा डान्स रियालिटी शो तुमच्या वीकएंडच्या आनंदाला ‘डान्सचा तडका’ देण्यासाठी येत आहे. या स्पर्धेसाठी ज्यांची निवड झाली आहे, असे ‘बेस्ट बारह’ स्पर्धक ENT स्पेशलिस्ट – करिश्मा कपूर, गीता कपूर आणि टेरेन्स लुईस यांना प्रभावित करण्यासाठी आपल्या शैलीत नावीन्य आणताना दिसतील. या वीकएंडला कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवण्यासाठी ‘स्त्री-2’ चित्रपटाचे कलाकार – श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव या मंचावर येणार आहेत. आपल्या या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करतानाच डान्सबद्दलचे त्यांचे प्रेम देखील दिसून येईल.

एकामागून एक मंत्रमुग्ध करणारे परफॉर्मन्स बघत असताना करिश्मा कपूरने भूतकाळातील एक रोचक आठवण सांगितली, जी ऐकताना श्रद्धा कपूरला खूप मजा वाटली. करिश्मा कपूर म्हणाली, “”मी श्रद्धाचे वडील, शक्ती कपूर जी यांच्यासोबत 30-40 पेक्षा जास्त चित्रपटांत काम केले आहे. मला एक घटना आठवते आहे, जेव्हा आम्ही उन्हाळ्याच्या दिवसांत ऊटी येथे शूटिंग करत होतो आणि उन्हाळ्याची सुट्टी असल्याने श्रद्धा आणि सिद्धांत त्यावेळी शूटिंगला यायचे. त्यावेळेसची ही गोष्ट आहे, जी मला स्पष्ट आठवते आहे. श्रद्धाने गुलाबी रंगाचा छोटासा बो असलेला गुलाबी फ्रॉक घातला होता आणि ती स्तिमित होऊन माझ्याकडे बघत होती. मी तिला सांगितले की, ती खूप छान दिसत आहेस आणि शक्ती जींना सांगितले की पुढे जाऊन श्रद्धा मोठी स्टार होईल.

लहानपणापासूनच तिच्यात एक वेगळीच चमक होती. तिचे डोळे फारच सुंदर आहेत. मला आठवते आहे की, ती शूट बघायला आली तेव्हा सगळ्यांचे निरीक्षण करत होती. मला वाटते, एका कलाकारासाठी हा एक मोठा गुण आहे.. निरीक्षण करणे आणि समजून घेणे की काय चालले आहे आणि मला वाटते की खूप लहान वयातच आपण भविष्यात काय करायचे आहे, (या व्यवसायात) हे तिला पक्के ठाऊक होते.

इतकेच नाही, श्रद्धा कपूरनेही सांगितले की पहिल्यापासून तिने करिश्माकडे आपला आदर्श म्हणून बघितले आहे आणि इंडियाज बेस्ट डान्सर – सीझन 4 मध्ये करिश्माच्या शेजारी बसण्याच्या हा क्षण तिला भावुक करणारा आहे. श्रद्धा कपूर म्हणाली, “मी करिश्माकडे नेहमी आदराने पाहिले आहे. मी तिची खूप मोठी फॅन आहे. आणि तुमचा विश्वास बसणार नाही, इतकी मी तिच्या गाण्यांवर नाचले आहे! तिच्या बहुमुखी प्रतिभेने मला नेहमी प्रेरित केले आहे. ती सुंदर आहे, उत्तम परफॉर्मर आहे आणि अद्भुत डान्सर आहे. भारतीय सिनेमाच्या इतिहासात तिच्यासारखे अन्य कोणी सापडणे विरळा आहे. आणि करिश्मा कपूर नक्कीच या मोजक्या लोकांपैकी एक आहे.

त्यानंतर, करिश्मा कपूर आणि श्रद्धा कपूर या दोघींनी ‘दिल तो पागल है’ चित्रपटातील ‘ले गई’ गाण्यावर जोरदार परफॉर्म करून मंच दणाणून सोडला. करिश्मा सोबत डान्स करण्याचे आपले स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करताना श्रद्धा म्हणाली, “आज माझे स्वप्न पूर्ण झाले. असे म्हणतात ना की, ‘ज्या गोष्टीची तुम्ही अगदी मनापासून कामना करता, ती गोष्ट तुम्हाला आयुष्यात मिळतेच.’ अगदी लहानपणापासून मी आरशाच्या समोर उभे राहून करिश्माच्या गाण्यांवर डान्स करायचे आणि आज प्रत्यक्ष तिच्यासोबत डान्स करण्याची संधी मला मिळाली!”

हा क्षण येथे बघा: https://www.instagram.com/reel/C-Zm9Cqvmj3/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

या शनिवारी आणि रविवारी बघायला विसरू नका, ‘इंडियाज बेस्ट डान्सर – सीझन 4’ चा ‘डान्स का तडका’ एपिसोड, रात्री 8:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!