Breaking News

पुण्यात मनसे नेते वसंत मोरे यांचे भावी खासदार उल्लेख असलेले बॅनर चर्चेत !

पुण्यामधून महत्वाची बातमी समोर येत आहे. पुणे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एक पाऊल पुढे आहे. पुणे शहरात सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्ते भावी खासदार म्हणून आपआपल्या नेत्यांचे बॅनर्स लावत आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे मोहन जोशी यांचे बॅनर लागल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांचे बॅनर लावण्यात आले आहे. त्यात “पुण्याची पसंत मोरे वसंत” असे लिहिले असून भावी खासदार म्हटले गेले आहे.

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांचे फ्लेक्स पाहायला मिळत आहे. आता मनसेचे नेते वसंत मोरे यांचे पुण्याचे भावी खासदार असे फ्लेक्स शहरात उभारण्यात आले आहेत. पुणे शहर लोकसभेसाठी सक्षम नेतृत्व कार्यसम्राट नगरसेवक वसंत मोरे असा मजकूर या फ्लेक्सवर लिहिण्यात आला आहे. मनसेच्या कसबा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष गणेश भोकरे यांनी या फ्लेक्स वर “पुण्याची पसंत मोरे वसंत” असे देखील लिहिले आहे.