देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग याचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशातून नव्हे जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.
काय आहे अयोध्या पोळ यांचे ट्विट ?
आमच्या जवळ 1000 रुपये असले तरी खुप पैसे आहेत असं वाटायचं तो तुमचा काळ.. तुमच्या शांततेत सुद्धा “देशहिताचे वादळ” असायचे.. कमीच बोललात पण कधी खोटं बोलला नाहीत.. तुमच्या रूपानं देशाला “#अर्थ व्यवस्थेचा सरदार” मिळाला होता…..
तुमच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो.. भावपूर्ण आदरांजली सर….🌸🙏
असं म्हणत त्यांनी शोक व्यक्त केला आहे.
दरम्यान, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा शासकीय दुःखवटा जाहीर करण्यात आला आहे. या काळात देशातील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाणार आहे. तसेच आज सकाळी 11 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.