सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल 15 एक धमाकेदार होळी स्पेशल एपिसोड घेऊन येत आहे. ज्यात दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी स्पेशल जज म्हणून उपस्थित राहतील. या विशेष पाहुण्यांसह उत्सवात जज श्रेया घोषाल, विशाल दादलानी आणि बादशाह, सूत्रसंचालक अभिजीत सावंत आणि मियांग चांग यांचाही समावेश आहे. संगीत, नॉस्टॅल्जिया आणि अविस्मरणीय क्षणांचे आनंददायी मिश्रण या भागात असेल. या एपिसोडमध्ये आयडॉल की बसंती उर्फ रितिका, मेरे नसीब मे या गाण्याचे हृदयद्रावक सादरीकरण करेल. हे गाणे एपिसोडचे प्रमुख लक्षवेधी ठरेल. तिची नाट्यमय अभिव्यक्ती आणि गाण्याने प्रभावित होऊन श्रेया घोषाल प्रेमाने म्हणते, ती गाण्यातले नाट्य खूप चांगल्या प्रकारे पकडते, त्यामुळे मी तिला ड्रामा क्वीन म्हणते, या सादरणीकरणाद्वारे एक नॉस्टॅल्जिक प्रवास सुरु होतो. कारण यानिमित्ताने बादशाह हेमा मालिनी यांना स्टार-स्टड चित्रपट नसीबमध्ये भूमिका करण्याच्या अनुभवाविषयी प्रश्न विचारतो.  हेमा मालिनी यांनी मल्टी स्टार कास्टिंग असलेल्या या चित्रपटात सहभागी होण्यासाठी सुरुवातीला संकोचले होते हे मान्य केले. त्या म्हणाल्या, ‘त्यांनी माझ्यासाठी मल्टी स्टार कास्टचा चित्रपट साइन केला तेव्हा मी घाबरले. हा सिनेमा एका वर्षात पूर्ण करण्याचे टार्टेट होते. पण सगळेच कलाकार बिझी होते. अमित जी, ऋषी कपूर, रीना रॉय, अमजद अली खान जी, शत्रुघ्न सिन्हा, अगदी सहकलाकारसुद्धा बिझी होते. सगळ्यांनी एकत्र येऊन चित्रीकरण करणे खूप कठीण होते. कारण आम्हाला त्याचवेळी इतर अनेक चित्रपटांचे शूटिंग सुरु होते. त्यासाठी आम्हाला खूप प्रवासही करावा लागत होता. पण आम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम केले. निर्माते आणि त्यांच्या टीमचे खूप खूप आभार.. मला वाटतं एका वर्षात आम्ही चित्रपट पूर्णही केला.’

या इव्हिनिंग नॉस्टॅल्जियात भर टाकताना मियांग चांग याने फरदीन खानने हेमाजी आणि फिरोज खान जी यांच्याबद्दल पूर्वी शेअर केलेली एक हृदयस्पर्शी गोष्ट शेअर केली. या प्रसंगाबद्दल सांगण्यास उद्युक्त केले. त्या म्हणाल्या, हा प्रसंग क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो, या गाण्यादरम्यान घडले. फिरोज खान जी खूप भावनिक चित्रपट निर्माते होते.

गाण्याच्या शेवटच्या सीनच्या वेळी मागील बाजूला लोक हसत होते. त्यामुळे त्यांना राग आला आणि रागाने काहीतरी लाथाडले. त्यांना नंतर कळले की तो माझा मेकअप बॉक्स होता. त्या गंमतीने पुढे म्हणाल्या, त्यानंतर दोन दिवस पिन-ड्रॉप सायलेन्स होता. कारण सगळेच घाबरले होते. ते माझे आहे, हे समजल्यानंतर त्यांनी माफी मागितली. क्लासिक परफॉर्मन्स, नॉस्टॅल्जिक प्रसंग आणि होळीच्या रंगांची उधळण असलेला इंडियन आयडॉल 15 एपिसोड ही एक अविस्मरणीय मेजवानी आहे. संगीत आणि आठवणींच्या जादुई उत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी ‘सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन’ आणि ‘सोनी लिव्ह’ वर शनिवारी आणि रविवारी रात्री 8.30 वाजता ट्यून करा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *