अमेरिकेत भारतीय वंशाच्या एका न्यायाधीशाला मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार भारतीय वंशाचे न्यायाधीश के.पी. जॉर्जला ‘वायर फ्रॉड’ आणि बनावट ‘निवडणूक आर्थिक अहवाल’ बनवणे मनी लाँड्रिंग प्रकरणात फोर्ट बेंड काउंटीच्या अटक करण्यात आली. नंतर त्यांची जामिनावर सुटका देखील झाली. डेमोक्रॅटिक पक्षाशी संबंधित असलेले जॉर्ज २०१८ पासून काउंटी न्यायाधीश म्हणून काम करत आहेत.
त्यांना अमेरिकन पोलिसांनी अटक केली. त्यानंतर दुपारी ३:३० च्या सुमारास त्यांना काउंटी तुरुंगात नेण्यात आले. शुक्रवारी आणि २०,००० डॉलर्सचा जामीन भरल्यानंतर त्यांची सुटका झाली. न्यायालयीन नोंदी आणि फोर्ट बेंड काउंटी डिस्ट्रिक्ट अॅटर्नी कार्यालयानुसार, जॉर्जवर तीस हजार डॉलर्स ते १.५० लाख डॉलर्सची मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप आहे.
मनी लाँडरिंगच्या आरोपानंतर न्यायाधीशांच्या राजीनाम्याची मागणीही सुरू झाली आहे. तथापि, न्यायाधीशांनी त्यांच्यावरील आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात जॉर्ज म्हणाले की, “मला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि मी स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढेन.” फोर्ट बेंड काउंटीतील वकील बिल रिकर्ट यांनी जॉर्ज यांना राजीनामा देण्याचे जाहीर आवाहन केले आहे. डिस्ट्रिक्ट अॅटर्नी कार्यालयाने या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी सुरू असल्याचे म्हटले आहे.
Leave a Reply