Breaking News

‘इंडियाज बेस्ट डान्सर 4’करिश्मा कपूरने स्व. सरोज खानची एक आठवण सांगितली

या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘इंडियाज बेस्ट डान्सर 4’ या डान्स रियालिटी शो च्या ग्रँड प्रीमियरमध्ये बेस्ट बारह स्पर्धक ‘स्टेज टू स्टारडम’ थीमला अनुसरून आपल्या उत्कृष्ट मूव्ह्ज दाखवतील. आपले परीक्षक म्हणजे ENT स्पेशलिस्ट – करिश्मा कपूर, गीता कपूर आणि टेरेन्स लुईस एक आकर्षक आणि महत्त्वाची घोषणा करताना दिसतील, ज्यामुळे स्पर्धेतली चुरस आणखी वाढेल. पहिल्यांदाच ग्रँड प्रीमियरमध्ये बेस्ट बारह स्पर्धकांना गुण देण्यात येतील, अशा प्रकारे ग्रँड प्रीमियरमध्येच स्पर्धेला सुरुवात होईल. इतकेच नाही, तर दर आठवड्याला 12 पैकी श्रेष्ठ 6 स्पर्धकांनाच विशेष सेक्शनमध्ये बसण्याची संधी मिळेल. आणि आपले तेथील स्थान टिकवून ठेवण्यासाठी त्यांना कठोर परिश्रम करावे लागतील.

पटणाहून आलेला 17 वर्षीय हर्ष केसरी आपला कोरिओग्राफर प्रतीक उतेकर याच्यासह ‘तेरे बिन’ आणि ‘सजनी रे’ गाण्यांच्या मॅशअपवर डान्स करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसेल. हर्ष आणि प्रतीक यांची आपल्या कलेच्या प्रती असलेली निष्ठा पाहून प्रभावित झालेली करिश्मा कपूर म्हणाली, “मी डान्स शिकत होते, त्यावेळी मी सत्यम हॉलमध्ये जात असे आणि सरोज खान जी मला शिकवत असत. त्याच सुमारास ‘तम्मा तम्मा’ची कोरिओग्राफी त्या करत होत्या. आणि मी सुद्धा त्या स्टेप्स शिकण्याचा प्रयत्न करत असे. नंतर मला समजले की, त्या कोरिओग्राफीवर माधुरी दीक्षित आणि संजय दत्त परफॉर्म करणार आहेत. त्यावेळी त्या स्टेप्स फारच अवघड वाटल्या होत्या. जेव्हा सरोज जींनी मला पाहिले तेव्हा त्या म्हणाल्या, “अच्छा! तू अजून इथेच आहेस काय! ये, या स्टेप्स शिकून घे.” म्हणून मग मी काही दिवस त्या स्टेप्स शिकत राहिले. त्यानंतर त्यांनी मला त्या स्टेप्स करून दाखवायला सांगितले आणि मी त्यांना करून दाखवले. मी जवळजवळ 4 ते 5 वेळा डान्स केला, ज्यामुळे माझा स्टॅमिना वाढण्यास मदत झाली. मला ते गाणे पाठ करायचे होते, म्हणून मग मी संपूर्ण गाणे पाठ केले आणि माझ्या स्टेप्स केल्या.”

या वीकएंडला बघा ‘इंडियाज बेस्ट डान्सर – सीझन 4’ चा ‘ग्रँड प्रीमियर’ रात्री 8:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!