Breaking News

इंडियाज बेस्ट डान्सर – सीझन 4 मध्ये टेरेन्स लुईस पुन्हा परीक्षक म्हणून काम करणार

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सर या शो ने डान्स रियालिटी शोजमध्ये डान्सचे नवीन मापदंड स्थापित केले आहेत. त्यामुळे या भव्य मंचावर परफॉर्म करण्यासाठी देशातील सगळे असामान्य प्रतिभावान परफॉर्मर्स उत्सुक असतात. या शोच्या नवीन प्रोमोमध्ये ‘जब दिल करे डान्स कर’ असा सोपा मंत्र दिला आहे. यातून डान्सची ताकद, त्याच्यामुळे जाग्या होणाऱ्या भावना आणि तणाव दूर करण्याची क्षमता व्यक्त झाली आहे.

हा प्रोमो येथे बघा: https://www.instagram.com/reel/C8eOvylPPOZ/?igsh=MWx4N3JyYmZmMWFiaA==

आपल्या अद्भुत डान्स टेक्निकबद्दल ओळखला जाणारा टेरेन्स लुईस या शोमध्ये पुन्हा एकदा परीक्षक म्हणून काम करणार आहे. त्याच्या सोबत गीता कपूर आणि या सत्रासाठी पॅनलवर दाखल झालेली नवीन परीक्षक करिश्मा कपूर असणार आहे. टेरेन्सकडे अनुभवाच्या शिदोरीबरोबरच टेक्निक पारखण्याची नजर आहे. तो स्पर्धकांच्या परफॉर्मन्समधील नेमकेपणा, त्यांचे नियंत्रण आणि हालचालींतील निर्दोषता पारखेल. स्पर्धकांना यथायोग्य मार्गदर्शन करणाऱ्या लुईसची इंडियाज बेस्ट डान्सरच्या मंचावर आलेल्या कित्येक डान्सर्सच्या प्रवासाला नेमका आकार देण्यात महत्त्वाची भूमिका आहे.

परीक्षकांच्या पॅनलवर परत येत असल्याचा आपला आनंद व्यक्त करताना टेरेन्स लुईस म्हणाला, “इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सत्रात परतताना मला खूपच आनंद होत आहे. प्रत्येक सीझनमध्ये या मंचावर जे प्रतिभावान येतात, ते अधिकाधिक उंच मापदंड स्थापन करतात. यावेळी या मंचावर कोणत्या अनोख्या डान्सिंग शैली सादर होणार आणि स्पर्धक काय वेगळेपण घेऊन येणार हे बघण्यास आणि त्या स्पर्धकांना तयार करण्यासाठी मी आतुर झालो आहे. डान्स हे अभिव्यक्तीचे एक दमदार माध्यम आहे. आणि पुन्हा एकदा इकडे येणाऱ्या परफॉर्मर्सच्या पॅशन आणि टेक्निकने चकित होण्यासाठी मी सज्ज आहे!”

इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 4 सुरू होत आहे 13 जुलै 2024 रोजी आणि प्रत्येक शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता त्याचे प्रसारण करण्यात येईल सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरून!