kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

जस्मिन भसीन आणि अली गोनी लवकरच अडकणार लग्नबंधनात !

जस्मिन भसीन आणि अली गोनी हे टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. हे कपल कधी लग्न करणार याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अशातच जास्मिन आणि अलीच्या लग्नाविषयी खास अपडेट समोर आली आहे.

कृष्णा मुखर्जीच्या अलीकडील व्लॉगमध्ये, जस्मिन भसीन आणि अली गोनी त्यांच्या कुटुंबासह दिवाळीच्या पार्टीत दिसले. ज्यामध्ये अलीला त्याच्या आणि जस्मिनच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावर अभिनेत्री म्हणाली की, ‘हो, पुढच्या वर्षी करणार’ शिवाय त्यांच्यासोबत जास्मिनच्या आईला जेव्हा विचारण्यात आलं, हे जोडपं पुढच्या वर्षी लग्न करणार आहे का? त्यावर जास्मिनची आई म्हणाली की, ‘अगदीच! मी त्यांना म्हणतेय आजच लग्न करा. मला सुट्टी पण आहे.’ जस्मिन आणि इतर सदस्य हसायला लागल्यावर अली म्हणाला, ‘हा म्हणजे तुमच्या सुट्टीसाठी आम्ही लग्न करायचं’

दरम्यान, जस्मिन आणि अली त्यांच्या लग्नाबद्दल मोकळेपणाने बोलतात. या विषयावर जेव्हा कोणीही या जोडप्याशी बोललं तेव्हा ते नेहमी म्हणाले की ते लग्नाचा विचार करत आहेत आणि लवकरच लग्न करणार आहेत. भारती सिंगसोबतच्या पॉडकास्टवर अलीने, जस्मिनचं कौतुक केलं आणि म्हणाला की, ती अशी मुलगी आहे जी नेहमी कुटुंबाला सोबत घेऊन जाते. जस्मिन भसीनच्या आईने जास्मिन आणि अली २०२५ मध्ये लग्न करणार असल्याचा खुलासा केला आहे.

जस्मिन भसीन आणि अली गोनी हे टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. ‘बिग बॉस १४’ मध्ये दोघांची भेट झाली आणि त्यानंतर त्यांनी नॅशनल टीव्हीवर एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिली. तेव्हापासून हे कपल एकमेकांसोबत खूप खास बॉन्ड शेअर करत असून सोशल मीडियावर त्यांचे रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे. जास्मिन आणि अली यांच्यावर त्यांचे कुटुंबीयच नाही तर त्यांचे चाहतेही मनापासून प्रेम करतात.