या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल 15 या देशातल्या अत्यंत लोकप्रिय गायन रियालिटी शो मध्ये ‘सेन्सेशनल 70s’ हा विशेष भाग साजरा होणार आहे, ज्यात या काळातील गाजलेली गाणी स्पर्धक सादर करतील. या भागात अभिनेत्री कंगना राणावत येणार आहे, जी ‘इमर्जन्सी’ या आगामी चित्रपटाची लेखक, दिग्दर्शक असून त्यात मुख्य भूमिका देखील साकारत आहे. तिच्यासोबत तिचे सह-कलाकार अनुपम खेर आणि श्रेयस तळपदे देखील या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहेत.
या भागात एका मजेदार संभाषणात ‘आयडॉल की क्रेझी गर्ल’ मानसी घोष हिने कंगनाला सांगितले की ती कंगनाची मोठी फॅन आहे. ती कंगनाला उद्देशून म्हणाली, “मी बऱ्याच मुलाखतींमध्ये हे ऐकले आहे की, दिग्दर्शक अशी तक्रार करतात की तुम्ही ज्या चित्रपटात काम करता, त्या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि पटकथा यात देखील तुम्ही ढवळाढवळ करता. त्यामुळे तुमच्या सोबत काम करायला त्यांना आवडत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःच दिग्दर्शन करायचे ठरवले का?” त्यावर कंगनाने खेळकरपणे उत्तर दिले, “सारा सियाप्पा खतम करो.. याचा अर्थ तुला माहीत आहे ना? ना रहेगा बास, ना बजेगी बासुरी.”
हसत हसत कंगना पुढे म्हणाली, “हे काही खरे नाही. ज्यांच्यासोबत मी काम केले आहे, त्या सगळ्यांविषयी मला खूप आदर आहे. त्यांनी मला नेहमीच प्रेरित केले आहे. काही उत्तम दिग्दर्शकांसोबत काम करण्याची मला संधी मिळाली. क्वीन, तनु वेड्स मनू, फॅशन आणि गॅंगस्टर यांसारखे चित्रपट त्यातील अद्भुत फिल्मोग्राफीबद्दल नावाजले गेले. यामुळे स्वतः दिग्दर्शन करण्याची स्फूर्ती मला मिळाली.”
कंगना पुढे म्हणते, “जेव्हा तुम्ही दहा लोकांसोबत काम करता, तेव्हा त्यातील दोघा-तिघांशी तुमच्या तारा नाही जुळत, पण तसे होणे ही सामान्य बाब आहे. तुम्ही सगळ्यांचे आवडते होण्यासाठी तुम्हाला स्वतः बदलण्याची गरज नाही. मी 2005 मध्ये या व्यवसायात आले आणि आता 2025 उजाडले आहे. पण इथे अजूनही काही बोटावर मोजण्याइतकेच दिग्दर्शक, अभिनेत्री आणि अभिनेते आहेत, ज्यांनी खरोखर मौलिक काम केले आहे. तुम्ही त्यांच्या अवतीभवती ‘चक्की पीसिंग’ करत राहता. त्यामुळे मी विचार केला, की नवीन प्रतिभा तयार करू या.”
कंगना अभिमानाने सांगते, “तुम्ही माझा चित्रपट ‘इमर्जन्सी’ बघितलात, तर तुम्हाला लक्षात येईल की, आम्ही जगभरातून उत्तमोत्तम प्रतिभा या चित्रपटात एकत्र केली आहे. आमच्या DoP (डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी) ने अकादमी अवॉर्ड जिंकले आहे. माझा प्रोस्थेटिक मेकअप आर्टिस्ट जगात सर्वश्रेष्ठ आहे. चित्रपटात, अनुपम जी आणि श्रेयस तळपदे सारखे राष्ट्रीय पुरस्कार विजेते कलाकार आहेत. मला पटकथा लेखनात ज्यांनी मदत केली, ते देशातले उत्तम लेखक आहेत. कधी कधी मला वाटतं की आपले चित्रपट आपल्याला निराश करू शकतात पण 20 वर्षे इथे काम केल्यानंतर मी विचार केला की काहीतरी नवीन करू या.” शेवटी ती आत्मविश्वासाने म्हणाली, “असं नाही आहे की, ज्यांच्यासोबत काम करावं असे फारसे लोक माझ्याकडे नाहीत. पण मला फक्त काहीतरी नवीन करायचं होतं, इतकंच.”
या भागात मस्ती, प्रेरणा आणि प्रामाणिकपणा दर्शविणारे क्षण आहेत, त्यामुळे चाहत्यांनी हा एपिसोड अवश्य बघावा. इंडियन आयडॉल 15 चा हा भाग अवश्य बघा, या वीकएंडला रात्री 8:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!