लोकसभा २०२४ च्या पहिल्या टप्प्यातील मतदान होण्यास काहीच वेळ शिल्लक आहे. अशातच काही उमेदवारांची संपत्ती वाढली तर काही उमेदवारांची संपत्ती ही कमी झली असल्याचे दिसून आले आहे.
अमोल कोल्हे :
शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची संपत्ती गेल्या पाच वर्षांत दुपटीने वाढली आहे. त्यांची आणि कुटुंबीयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता सुमारे आठ कोटी ४२ लाख रुपये एवढी आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत म्हणजेच सन २०१९ मध्ये त्यांची मालमत्ता सुमारे साडेचार कोटी रुपयांची होती. त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती नमूद करण्यात आली आहे. कोल्हे यांच्याकडे ४० हजार रुपये, तर त्यांच्या पत्नीकडे २५ हजार रुपयांची रोख रक्कम आहे. कोल्हे यांच्याकडे पजेरो ही चारचाकी, तर बुलेट ही दुचाकी आहे. त्यांच्याकडे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव (कोल्हेमळा) येथे शेतजमीन आहे, तर पुणे जिल्ह्यात नारायणगाव, मुंबईतील परळ आणि भोईवाडा, नाशिकमध्ये देवळाली येथे सदनिका आहेत. यापैकी भोईवाडा आणि नाशिक येथील सदनिका खासदार झाल्यानंतर खरेदी केल्या आहेत. कोल्हे यांच्यावर दोन कोटी ९९ लाख ६५ हजार ५४२ रुपयांचे कर्ज आहे. कोल्हे यांच्याकडे ८२ लाख ३९ हजार ५०५ रुपये, तर त्यांच्या पत्नीकडे ४८ लाख २९ हजार दहा रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर कोल्हे यांच्याकडे तीन कोटी ६० लाख २५ हजार २३६ रुपये आणि त्यांच्या पत्नीकडे तीन कोटी ५१ लाख १३ हजार ५०० रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
रवींद्र धंगेकर :
पुणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार, कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या मालमत्त्तेत आमदार झाल्यावर घट झाली आहे. गेल्या वर्षी पोटनिवडणुकीच्यावेळी सात कोटी दहा लाख ६५ हजार १४३ रुपयांची स्थावर आणि जंगम अशी मालमत्ता असलेल्या धंगेकरांची सुमारे सव्वा कोटीने मालमत्ता कमी झाली आहे. पोटनिवडणुकीच्यावेळी धंगेकर यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे आठ कोटी ३६ लाख १० हजार ४५६ रुपयांची मालमत्ता होती. मात्र, यावेळी एक कोटी २५ लाख ४५ हजार ३१३ रुपयांची संपत्ती कमी झाली आहे. गेल्या वर्षी पोटनिवडणुकीच्यावेळी त्यांनी जंगम मालमत्ता ४७ लाख सहा हजार १२८ दाखविली होती. आता त्यांनी ही मालमत्ता २३ लाख २६ हजार ८३ रुपये दाखविली आहे. त्यामुळे त्यांच्या जंगम मालमत्तेत एका वर्षात २३ लाख ८० हजार ४५ रुपयांनी घट झाली आहे. तसेच त्यांच्यावर ७१ लाख १५ हजार ४३५ रुपयांचे कर्जही आहे. धंगेकर हे आठवी उत्तीर्ण आहेत. त्यांच्याकडे रोख ७६ हजार ४०० रुपये, तर पत्नीकडे ६२ हजार १०० रुपयांची रोख रक्कम आहे. धंगेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांचा शेती, सोने-चांदी कारागिरी आणि बांधकाम व्यवसाय आहे. त्यांची जंगम मालमत्ता २३ लाख २६ हजार ८३ रुपये, तर पत्नीकडे ७२ लाख ३८ हजार ४४३ रुपयांची आहे. त्यांची स्वसंपादित आणि वारसाप्राप्त स्थावर मालमत्ता चार कोटी ५९ लाख ६३ हजार ९५८ आहे, तर पत्नीकडे दोन कोटी ६० लाख ७२ हजार ९९४ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्याकडे दोन दुचाकी, दहा तोळे सोने, तर पत्नीकडे १५ तोळे सोने आहे.
त्यांच्या रविवार पेठ, मंगळवार पेठ, कसबा पेठ आणि शिवाजीनगर येथे सदनिका आहेत. तसेच त्यांची दौंड तालुक्यात पिंपळगाव आणि हवेली तालुक्यात नांदोशी येथे शेती असून कोथरूड येथे साडेचार हजार चौरस फुटांची बिनशेती जागा आहे. धंगेकर यांच्यावर आठ प्रलंबित खटले आहेत.
सुप्रिया सुळे :
खासदार सुप्रिया सुळे कोट्यवधींच्या मालकीन आहेत. त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांनी आज बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आणि सुप्रिया पवार असा थेट सामना होणार आहे. शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यांनी भरलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या संपत्तीविषयी मोठी माहिती समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडील एकूण स्थूल मालमत्ता ३८ कोटी रुपये इतकी आहे. त्यांचं पती सदानंद सुळे यांची संपत्ती १ अब्ज १४ कोटी इतकी आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे कोणतीही कार, विमान नाही. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रतिज्ञापत्रातल्या महितीनुसार सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार आणि त्यांचा मुलगा पार्थ पवार यांच्याकडून ५५ लाख रुपये उधार घेतले आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यावर भावजय आणि भाच्याचं एकूण ५५ लाखांचं कर्ज आहे, अशी माहिती प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. अर्ज भरताना उमेदवाराची सांपत्तिक स्थितीही नमूद करावी लागते. प्रतिज्ञापत्रात सुप्रिया सुळे यांनी आपल्यावर ५५ लाखांचं कर्ज असल्याचं सांगितलं आहे. सुळेंनी पार्थ पवार यांच्याकडून २२ लाख रूपये कर्ज घेतलंय तर सुनेत्रा पवार यांच्याकडून ३५ लाखांचं कर्ज घेतलंय. याशिवाय सुप्रिया सुळे यांची १४२ कोटींची मालमत्ता आहे अशी माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांना यावर्षी शेतीतून शून्य उत्पन्न मिळालंय.
शाहू छत्रपती :
कोल्हापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू शहाजी छत्रपती यांच्या नावे स्थावर व जंगम अशी मिळून २९७ कोटी ३८ लाख ०८ हजार रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी संपत्ती विवरणपत्रात नमूद केले आहे. त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे छत्रपती यांच्या नावे ४१ कोटी ०६ लाखांची संपत्ती आहे.विशेष म्हणजे त्यांच्यावर कसलेही कर्ज नाही.शाहू छत्रपतींची १४७ कोटी ६४ लाख ४९ हजार रुपयांची जंगम मालमत्ता, तर १४९ कोटी ७३ लाख ५९ हजारांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे यांच्या नावे अनुक्रमे १७ कोटी ३५ लाख व २३ कोटी ७१ लाखांची जंगम व स्थावर मालमत्ता आहे. शाहूंकडे एक कोटी ५६ लाखांचे सोन्याचे, तर ५५ लाखांचे चांदीचे दागिने आहेत. शाहू छत्रपतींच्या नावावर असलेल्या वाहनांची किंमत सहा कोटी आहे. १२२ कोटी ८८ लाख इतक्या किमतीची शेतजमीन आहे. पत्नी याज्ञसेनी यांच्या नावावर सात कोटी ५२ लाख रुपयांची शेतजमीन आहे.
उदयनराजे भोसले :
लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने उदयनराजेंनी महायुतीचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत दिलेल्या नामनिर्देशित पत्रात त्यांच्या संपत्तीची माहिती दिली आहे. त्यामध्ये, उदयनराजे व त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती अब्जावधी रुपयांची असून त्यामध्ये स्थावर आणि जंगम मालमत्तेचा समावेश आहे. रोकड, सोने-चांदी व चारचाकी गाड्या ह्या जंगम मालमत्ता आहे.
उदयनराजेंकडील दागिने
उदयनराजेंकडे सोनं चांदी ३०,८६३ ग्रॅम (किंमत २ कोटी ६० लाख ७४ हजार )
पत्नीकडेदागिने – ४७५० ग्रॅम (३५ लाख ६४ हजार )
कुटुंबाचे ६२८ ग्रॅम (४४ लाख ३५ हजार
मुलीचे ७०५४ ग्रॅम सोनं, चांदी आणि हिरे मिळून (५ लाख २९ हजार )
उदयनराजेंकडील कार (गाड्या)
उदयनराजेंच्या मालकीच्या कार – जिप्सी, २मर्सिडीज, ऑडी-डी, फॉर्चुरल, स्कॉर्पिओ,टॅक्टर, एस क्रॉस अशी वाहनं आहेत.
उदयनराजेंची संपत्ती
रोख रक्कम
स्वत: = ५,८५,७१५
पत्नी = १,३५,८९८०
हिंदू अविभक्त कुटुंब = ३,६८,९००
मुलगा = २२,४००
एकूण स्थूल उत्पन्न =
उदयनराजे – १६ कोटी ८५ लाख ७७ हजार ०४८
पत्नी – १ कोटी २९ लाख ९७ हजार ६१
हिंदू कुटुंब – २ कोटी १ लाख ८० हजार
मुलगा – १५ लाख ७४ हजार ४३३
मुलगी – २२ लाख २२ हजार ६१३
१ कोटी ९० लाख ५ हजार १६५ रुपये किमतीच्या सर्व गाड्या
जमीन –
उदयनराजे – १ अब्ज २७ कोटी ९९ लाख ३० हजार ५४२
कुटुंब – ५५ लाख
बिगरशेत जमीन
उदयनराजे – २० कोटी १४ लाख २० हजार ९९७
पत्नी – १ कोटी १० लाख १२ हजार ५७०
कुटुंब – १९ कोटी ९३ लाख १२ हजार ६९६
सर्व जमिनींचं एकूण मूल्य –
उदयनराजे – १ अब्ज ७२ कोटी ९४ लाख ४९ हजार ६९१
पत्नी – ३ कोटी ७९ लाख ३७ हजार ५७०
कुटुंब – २८ कोटी ७९ लाख ४८ हजार ५६५
मुलगा – ३ लाख १४ हजार ८२०
कर्ज –
उदयनराजे – २ कोटी ४४ लाख ६३ हजार ८४२
जंगम मालमत्ता
स्वत: – १६ कोटी ८५ लाख ७७ हजार ४८
पत्नी – १ कोटी २९ लाख ९७ हजार ६१
कुटुंब – २ कोटी १ लाख ८० हजार २३७
उदयनराजे एकूण संपत्ती स्थावर आणि जंगम
१ अब्ज ९० कोटी ९३ लाख ६४ हजार ६३४
पत्नीची एकूण संपत्ती स्थावर आणि जंगम
६ कोटी ८९ लाख ४७ हजार २०१
कुटुंब – ३४ कोटी ७१ लाख ०७९०४
मुलगा -१५ लाख ७४ हजार ४३३
मुलगी – २२ लाख २२ हजार ६१३
उदयनराजेंची एकूण संपत्ती
२ अब्ज ९६ कोटी ३९ लाख ११ हजार ५८५