देशात गेल्या दीड महिन्यांपासून सुरु असलेली लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया आज संपुष्टात येत आहे. देशात शुक्रवारी लोकसभेचे सातव्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान पार पडले. हे मतदान संपत असताना सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या विविध माध्यम संस्थांच्या एक्झिट पोल्सची आकडेवारी जाहीर होत आहे.

महाराष्ट्रात एकूण 48 जागा आहेत. टाईम्स नाऊ नवभारत – ईटीजी एक्झिट पोलनुसार,भाजप: २०-२२राष्ट्रवादी (अजित पवार गट) : १शिवसेना (शिंदे गट): 4शिवसेना (उद्धव ठाकरे गट): 13-15काँग्रेस : ४-५राष्ट्रवादी (शरद पवार गट): 3-4

उत्तराखंडमध्येही भाजप पाचही जागांवर विजयी होताना दिसत आहे. टाईम्स नाऊ नवभारत एक्झिट पोलनुसार, काँग्रेस येथे एकही जागा जिंकेल अशी अपेक्षा नाही.

इंडिया टीव्ही-सीएनएक्स एक्झिट पोलच्या निकालानुसार आम आदमी पार्टी आणि काँग्रेसची युती दिल्लीत अपयशी ठरताना दिसत आहे. येथे भाजप सातही जागा जिंकू शकतो.

एबीपी नुसार ,

मविआ- 23 ते 25
महायुती - 22 ते 26 

गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला महाराष्ट्रात 41 जागांवर विजय मिळाला होता. मात्र, आता आकडा 26 जागांपर्यंत खाली आल्यास हा भाजपप्रणित NDA आघाडीसाठी मोठा धक्का ठरेल. या 26 जागांमध्ये भाजपचे किती उमेदवार असणार, हे पाहावे लागेल. यापैकी बहुतांश उमेदवार भाजपचे असल्यास शिंदे गट आणि अजित पवार गटामुळे फारसा फायदा झाला नसल्याचे स्पष्ट होईल.