महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात वाऱ्याप्रमाणे घटना घडत आहेत . अशातच आता महत्वाची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील प्रदेश बीआरएस पक्ष आता शरद पवार गटात विलीन होऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यातील बीआरएसचे पदाधिकारी येत्या 6 तारखेला पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश करतील. राज्यातील बीआरएस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आज शरद पवार यांच्यासोबत बैठक पार पडली. यानंतर ही माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना मोठा धक्का बसला आहे.