kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

“निकालांनंतर महाराष्ट्रात सरप्राईज मिळतील” ; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं सूचक विधान

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

महाराष्ट्रातील निकालांनंतरची स्थिती याबाबत राज ठाकरेंना प्रश्न केला असता त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली. “या निवडणुकीत काय होईल हे कुणीच सांगू शकत नाहीये. मला वाटतं यावेळी अनेक गोष्टींचे वेगवेगळे सरप्राईजेस मिळतील. अजून ८-१० दिवस थांबा. मग तुम्हाला कळेल काय सरप्राईजेस आहेत. सरप्राईजबद्दल आधीच कसं सांगणार?” असं राज ठाकरेंनी म्हटल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, राज ठाकरेंच्या ज्या विधानावरून ही सगळी चर्चा सुरू झाली, त्यावरदेखील त्यांनी यावेळी स्पष्टीकरण दिलं. “मी बोलता बोलता म्हणालो की भाजपाचं सरकार येईल म्हणजे युतीचं सरकार येईल. त्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील ही माझी इच्छा नव्हे तर माझं भाकित आहे. ती युती आहे. त्यात कुणाला मुख्यमंत्री करायचं हे ते ठरवतील. पण आमच्या पाठिंब्याशिवाय त्यांचं सरकार स्थापन होणार नाही हे निश्चित आहे. तुम्ही बघालच”, असं राज ठाकरे म्हणाले.

भाजपालाच का पाठिंबा दिला या प्रश्नावर राज ठाकरेंनी कारण सांगितलं. “शिवसेनेत असल्यापासून माझा भाजपाशीच दुसरा राजकीय पक्ष म्हणून संबंध आला. काँग्रेस-राष्ट्रवादीशी माझा तसा संबंध आला नाही. ज्यांच्याशी तुम्ही संवाद साधू शकता, त्यांच्यासोबतच तुम्ही राहू शकता”, असं ते म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीच्या एका प्रचारसभेत राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं होतं. त्यांनी त्यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार केल्याचं पाहायला मिळालं. “विषयांची समज, त्यांची सोडवणूक करणं, महाराष्ट्राच्या प्रश्नांबाबतचं आकलन या क्षणी देवेंद्र फडणवीसांकडे चांगलं आहे. एकनाथ शिंदे माणूस दिलदार आहे. सढळ हातांनी ते मदत करतात. राजकारणात अशी माणसं लागतात. त्यामुळे त्यांचं कॉम्बिनेशन योग्य पद्धतीने चाललंय”, अशी भूमिका राज ठाकरेंनी यावेळी मांडली.