Breaking News

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानी माढा लोकसभा मतदारसंघाबात बैठक, युतीधर्म पाळण्याचे निर्देश

देवगिरी निवासस्थानी माढा लोकसभा मतदारसंघाचे अनुषंगाने बैठक पार पडली. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघासाठी युतीधर्म पाळा असे कार्यकर्त्यांना निर्देश दिले आहेत 

रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे काम न करण्याची भूमिका घेतल्यानंतर अजित पवार यांनी तत्काळ देवगिरी निवासस्थानी सर्व पदाधिकाऱ्यांचे बैठक बोलावली होती 

आजच्या बैठकीला माढा लोकसभा मतदारसंघातील फलटणचे आमदार दीपक चव्हाण रामराजे नाईक निंबाळकर माजी आमदार प्रभाकर घाडगे या सोबतच नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब सोळसकर उपस्थित होते