काजोलची बहीण अभिनेत्री तनिषा मुखर्जी सध्या खूप चर्चेत आली आहे. एका कार्यक्रमात तनिषा बोल्ड लूकमध्ये पाहायला मिळाली. तिच्या या बोल्ड लूकने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तसंच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तनिषा मुखर्जीची तुलना उर्फी जावेदशी केली जातं आहे. १३ मार्चला मुंबईत वर्ल्ड मॅगझीनच्या कॉस्ट्यूम फॉर कॉज गाला कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी हटके लूकमध्ये पाहायला मिळाले. वामिका गबी, हुमा कुरेशी, सनी लिओनी, रसिका दुग्गल अशा अनेक अभिनेत्री अतरंगी लूकमध्ये दिसल्या. पण, तनिषा मुखर्जीच्या बोल्ड लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या कार्यक्रमात तिने ट्रान्सपरंट काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. ज्यावर पांढऱ्या रंगाची फुलं होती. तनिषाच्या या लूकचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. तिचा बोल्ड लूक नेटकऱ्यांना खटकला आहे.
“हे सर्व उर्फीवर चांगलं दिसत”, “आता काजोलची इज्जत काय राहिली?”, “उर्फीची बर्थडे पार्टी आहे का?” अशा प्रतिक्रिया तनिषा मुखर्जीच्या व्हिडीओवर उमटल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “तुझ्या जागी उर्फी असती तर जास्त चांगलं दिसलं असतं.” तसंच चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं की, अजून एका उर्फी जावेदची गरज नाही. पाचव्या नेटकऱ्याने लिहिलं, “काजोलची ही बहीण आहे? वाटतं नाही.”
Leave a Reply