Breaking News

बालगंधर्व रंगमंदिराच्या ५६ व्या वर्धापनदिनानिमित्त ३ दिवस भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

पुण्याची सांस्कृतिक ओळख असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराला यंदा ५६ वर्षे पूर्ण होत आहेत. बालगंधर्व रंगमंदिरांच्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व परिवाराच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते तसेच कला, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना विविध पुरस्कारांने गौरविण्यात येते. रंगमंदिराचा ५६ वा वर्धापन दि. २५ जून ते २७ जून २०२४ या कालावधीत संपन्न होणार आहे.  बालगंधर्व परिवारांचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी मेघराज राजेभोसले (अध्यक्ष बालगंधर्व परिवार), अलविरा मोशन एंटरटेनमेंट च्या दिपाली कांबळे,पराग चौधरी,योगेश सुपेकर, शोभा कुळकर्णी, चीत्रसेन भवार,संदीप पाटील,अरुण गायकवाड, कैलास माझिरे,विनोद धोकटे,योगेश देशमुख, शशिकांत कोठावळे,गणेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

बालगंधर्व वर्धापन दिनाच्या सोहळ्या विषयी अधिक माहिती देताना मेघराज राजेभोसले म्हणाले की, २५ जून रोजी सकाळी ९:३० वा गणेश वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. यानंतर सकाळी १० वा. बालगंधर्व यांच्या गाजलेल्या संगीत नाटकातील पद आणि प्रवेश यांचे सादरीकरण कलाद्वयी संस्थेच्या वतीने होणार आहे. सकाळी ११ वा. मुख्य  उद्घाटन समारंभ होणार आहे, याप्रसंगी उल्हासदादा पवार, (मा. आमदार), मा. राजेंद्र भोसले, (आयुक्त, पुणे म.न.पा.), डॉ. संजयजी चोरडिया, (सुर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशन), मा. सूरज मांढरे, (आय.ए.एस. शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य), सिनेअभिनेत्री वर्षा उसगांवकर, प्रिया बेर्डे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार , सुचेता आवचट (संगीत नाटक), राजन मोहाडीकर (लेखन), अमोल जाधव (बालनाट्य), आनंद जोशी (दिग्दर्शन), गौरी रत्नपारखी (युवा लेखक) तर पत्रकारितेतील पुरस्कार सुवर्णा चव्हाण (प्रिंट मीडिया),चंद्रकांत फुंदे (इलेक्ट्रॉनिक मीडिया),अजय कांबळे (डिजिटल मीडिया) यांना प्रदान करण्यात येणार आहेत. 

दुपारी   १.३० वा.  कथा कथन : (व. पूं.ची कथा) सादरकर्त्या : संगिता इनामदार, नाशिक, दु. २.३० संगीतबारी: सादरकर्ते न्यु अंबिका कला केंद्र, वाखारी, चौफुला. दु. ४ वा.   “मालिकांच्या मालकिणी” या कार्यक्रमात उषा नाडकर्णी, वर्षा उसगांवकर, प्रिया बेर्डे, पूजा पवार, सुरेखा कुडची, तेजस्विनी लोणारी व रमा नाडगौडा यांच्याशी राजेश दामले संवाद साधणार आहेत, 

सायंकाळी  ५.३० ते ७.  दरम्यान “स्ट्रगलर साला” या लोकप्रिय वेब सिरीज मधील  कुशल बद्रिके, अभिजीत चव्हाण, विजू माने, संतोष जुवेकर यांच्याशी अश्विनी धायगुडे-कोळेकर संवाद साधणार आहेत, तर सायंकाळी 7. 15 वा, “मुसाफिर है हम तो” गझलचा कार्यक्रम. सुरप्रीत अशोक, गायिका : गायत्री गुल्हाने (पटियाला व किराणा घराण्यातील उत्कृष्ट गायिका) सादर करणार आहेत, 

तर रात्री 8 वा. व्हॅलेंटाईन डे, आल्याड पल्याड, आम्ही ज़रांगे, एक संघर्ष योद्धा : या चित्रपटातील कलावंतांशी हितगुज करण्यात येईल. पहिल्या दिवसाचा समारोप  स्व. मोहम्मद रफी साहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त रफी साहेबांच्या गीतांचा कार्यक्रम ‘गफार मोमीन प्रस्तुत रफी १००” ने होणार आहे. 

महोत्सवात दुसऱ्या दिवशी २६ जून रोजी सकाळी १० वा,  बालगंधर्व परिवारातील सदस्यांच्या इयत्ता १० वी, १२ वीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत पाल्यांचा सत्कार होणार आहे,  यानंतर रत्नाकर शेळके डान्स अकॅडमी प्रस्तुत १० बालकलाकारांचा नृत्याविष्कार, चैत्राली माजगावकर भंडारी अंजली शहा यांचा बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम, जादुगार रघुराज यांचे जादुचे प्रयोग सादर होणार आहेत.  दुपारी १ वा, “महिलांसाठी लावणी महोत्सव” – सादरकर्ते नामवंत लावणी सम्राज्ञी. विशेष उपस्थिती मा. स्वरुपादीदी मोहिते पाटील, सिने अभिनेत्री वर्षा उसगांवकर व प्रिया बेर्डे. 

दुपारी ४ वा.  नाट्यप्रवेशांचा गजरा: मराठी रंगभूमीवरील गाजलेल्या चार व्यावसायिक नाटकांतील नाट्यप्रवेश एकच प्याला, बुवा तेथे बाया, दुरीतांचे तिमीर जावो, गाढवाचं लग्न, सादरकर्ते राज कुबेर, अभिषेक अवचट, माधवी जोशी अवचट, निखील केंजळे, प्रदिप फाटक, अश्विनी थोरात, सुशिलकुमार भोसले, मच्छिंद्र भास्कर, सुरेश जोग, गौरी रत्नपारखी, राजन कुलकर्णी, उदय थत्ते, राजेंद्र उत्तुरकर, विवेक काटकर, विनोद खेडकर आणि जयमाला इनामदार.

सायंकाळी ५ वा, विश्वश्रेष्ठ “कान” मध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात  विशेष पुरस्काराने सन्मानित अभिनेत्री छाया कदम यांचा सत्कार आणि दिलखुलास संवाद, सूत्रधार-राज काझी.

सायंकाळी ६.३० ते स.७.३० वा. पुणेरी तड़का (कॉमेडी स्किट्स) चा बहारदार कार्यक्रम सहभाग : रजनी भट-आशा तारे, सिद्धेश्वर झाडबुके -आनंद जोशी, सीमा पोटे-सुधाकर पोटे, बाळासाहेब निकाळजे -संजय मगर-हेमा कोरबरी, हसन शेख पाटेवाडीकर व सहकलाकार, सायंकाळी ७.४५ ते रा.९ “जीवन सुंदर आहे” सुप्रसिद्ध व्याख्याते श्री. गणेश शिंदे, रात्री ९:३० वा.  स्व. राज कपूर यांच्या जन्मशताब्दी निमित्त राज कपूर यांचा जीवनप्रवास व त्यांच्या चित्रपटातील सुमधुर गीतांचा कार्यक्रम सादरकर्ते मनीषा लताड आणि सहकारी (रिमेंबरींग राज)

वर्धापन दिन सोहळा समारोपाच्या दिवशी सकाळी १०.३० ते ११ वा. अंजली राऊत नागपूर यांचे भरतनाट्यम् नृत्य, श्रावणी शैलेश लोखंडे (बालकलाकार) भरतनाट्यम्-कथ्थक नृत्य फ्युजन

सकाळी ११. वा. मराठी संगीत रंगभूमीचे तारणहार दिग्गज नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी निमित्त स्मरण, गप्पा आणि गाणी सहभाग : निर्माते, अभिनेते विजय गोखले, ज्ञानेश पेंढारकर, ज्येष्ठ अभिनेत्री दीप्ती भोगले, सूत्रधार डॉ. वंदना बोकील कुलकर्णी , दु. १ वा. “महाराष्ट्राची लोकधारा” सादरकर्ते पुण्यनगरीतील यशवंत, गुणवंत, लोक कलावंत.

सायंकाळी ४.३० ते ६ वा.  ‘बाई गं’ या चित्रपटाच्या प्रदर्शना निमित्ताने अभिनेता स्वप्नील जोशी आणि सहकलाकार यांच्याशी धमाल गप्पा ! सूत्रधार : सौमित्र पोटे, सायंकाळी ६:३० वा. लोकगीतांचा कार्यक्रम “आवाज महाराष्ट्राचा” सहभाग गायत्री शेलार, किशोर जावळे, सार्थक शिंदे, अमर पुणेकर, अजय गायकवाड (मुंबई) आणि महागायक चंदन कांबळे.

सायंकाळी ६:३०. वा सुप्रसिद्ध उद्योजक “पुनीतजी बालन”, यांच्याशी वार्तालाप, सहभाग : विनोद सातव तसेच “पुनीतजी बालन” यांच्या शुभहस्ते ५६ व्या वर्धापन दिनाच्या निमित्त *५६ किलोचा केक, कापून सोहळ्याची सांगता,रात्री ९:३० वा,  सुप्रसिद्ध संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा बहारदार कार्यक्रम * L. P. Night * सादरकर्ते: हिम्मतकुमार पंड्या आणि गितांजली जेधे व सह कलाकार सादर करणार आहेत असे मेघराज राजेभोसले यांनी सांगितले.