Breaking News

बोपोडीचा नियोजनबद्ध विकास करणार – मनिष आनंद

बोपोडी परिसरात असलेल्या वस्ती, झोपडपट्टी परिसरात वाहतूक कोंडी, अनियोजित विकास कामे आणि कचरा या मोठ्या समस्या आहेत. या समस्यांवर तोडगा काढू आणि बोपोडीचा नियोजनबद्ध विकास करू आश्वासन छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांनी दिले.

बोपोडी परिसरातील औंध रोड आणि भाऊ पाटील रोड भागात काढण्यात आलेल्या पदयात्रेत नागरिकांशी संवाद साधताना आनंद बोलत होते.

पुढे बोलताना आनंद म्हणाले, डॉ. आंबेडकर नगर, चव्हाण वस्ती येथे वाहतूक कोंडी आणि कचरा न उललाला जाणे ही मोठी समस्या आहे, वाहतूक पोलिस आणि महापालिका प्रशासनाशी संवाद साधून या प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल. स्पायसर कॉलेज जवळ नव्याने बांधण्यात आलेल्या पुलावर प्रशासनाने करोडो रुपयांचा खर्च केला आहे, मात्र या पूलाची व्यवहार्यता आधी तपासण्यात आलेली दिसत नाही कारण या पुलाचा वापरच होत नाही. असा अनियोजित विकास म्हणजे जनतेच्या पैशांची निव्वळ उधळपट्टी आहे, भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी मी बोपोडीचा नियोजबद्ध विकास आराखडा राज्य सरकारकडून मंजूर करून घेईल असेही आनंद यांनी सांगितले.

दरम्यान, आनंद यांनी आज खडकी मधील डीसेबल होमला भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *