kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘तारख मेहता का उल्टा चश्मा’मधील लोकप्रिय अभिनेता रोशन सिंह सोढी 4 दिवसांपासून बेपत्ता

‘तारख मेहता का उल्टा चश्मा’ आणि रोशन सिंह सोढी कुणाला माहिती नसणार, असं कधीच होणार नाही. जसा जेठालाल लोकप्रिय आहे, तसाच रोशन सिंह सोढी हा देखील प्रसिद्ध आहे. पण रोशन सिंह सोढी ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात रुजवणारा अभिनेता गुरुचरण सिंह गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. एवढा लोकप्रिय अभिनेता नेमका गेला कुठे? असा प्रश्न उपस्थित होतोय.

गुरुचरण 22 एप्रिलला दिल्ली विमानतळावर शेवटचे दिसले होते. दिल्ली विमानतळावरुन ते मुंबईला येणार होते. पण ते मुंबईला पोहोचलेच नाहीत. याशिवाय ते तेव्हापासून घरीदेखील पोहोचले नाहीत. गुरुचरण यांचा शोध पोलीसही घेत आहेत. पण त्यांचा तपास अजून लागलेला नाही. गुरुचरण सिंह यांच्या वडिलांनी त्यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, “माझा मुलगा गरुचरण सिंह, ज्याचं वय 50 वर्ष आहे, तो 22 एप्रिलच्या सकाळी 8.30 वाजता मुंबई विमानतळाच्या दिशेला निघाला होता. पण तो मुंबईला पोहोचला नाही आणि घरीदेखील परतला नाही. त्याच्याशी फोनवरही संपर्क होऊ शकलेला नाही. त्याची मानसिक अवस्था चांगली आहे. आम्ही त्याचा शोध घेत आहोत. पण तो बेपत्ता आहे.”

गुरुचरण बेपत्ता झाल्याची बातमी समोर आल्यापासून त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अनेकांकडून दु:ख व्यक्त केलं जात आहे. गुरुचरण यांचा लवकर शोध लागावा यासाठी अनेकांकडून प्रार्थना केली जात आहे.