बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादुकोणची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. दीपिकाने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही अभिनेत्रीचा चाहतावर्ग आहे. अभिनेत्री आपल्या डाएटमध्ये नेमकं काय खातात हे जाणून घेण्यासाठी काही लोक उत्सुक असतात. सध्या दीपिका पादुकोण प्रेग्नेंट आहे. ती आपल्या प्रेग्नन्सीचा पूर्ण आनंद घेत आहे. शिवाय आपल्या फिटनेसचीही काळजी घेत आहे.

दीपिका पादुकोण सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती आपल्या लाईफस्टाईलबाबत बऱ्याच गोष्टी शेअर करत असते. दरम्यान, दीपिकाने आपल्या इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने तिच्या खाद्यपदार्थांच्या फोटो शेअर करत संतुलित आहाराचा अर्थातच डाएटचा खरा अर्थ सांगितला आहे. ही पोस्ट खासकरून अशा लोकांसाठी आहे जे वजन कमी करण्यासाठी डाएट करतात आणि सर्वकाही खाणे बंद करतात. चला तर मग, दीपिकाच्या पोस्टमधून ‘डाएट’ या शब्दाचा खरा अर्थ जाणून घेऊया.

दीपिका पादुकोणचा फिटनेस पाहून फॅन्सच नव्हे तर अनेक सेलिब्रेटीदेखील प्रभावित होतात. अभिनेत्रीचा फिटनेस मंत्रा अनेकांना जाणून घ्यायचा असतो. सध्या अभिनेत्री प्रेग्नेंट आहे. मात्र तरीसुद्धा दीपिकाने आपला फिटनेस फारच उत्तम सांभाळला आहे. दीपिकाने डाएटचा अर्थ सांगतांना काय म्हटले आहे ते [पाहूया. दीपिका पदुकोणने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, डाएट या शब्दाबाबत अनेक गैरसमज आहेत. अनेकदा लोकांचा असा विश्वास आहे की डाएट म्हणजे उपाशी राहणे, कमी खाणे आणि आपल्याला आवडत नसलेल्या गोष्टी खाणे. मात्र प्रत्यक्षात डाएट म्हणजे एखादी व्यक्ती काय खातो आणि काय पितो. दीपिकाने पोस्टमध्ये सांगितले आहे की, डाएट हा शब्द ग्रीक शब्द ‘डायटा’ वरून आला आहे, ज्याचा अर्थ ‘जगण्याचा मार्ग’ असा आहे.

दीपिकाने एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तीन खाद्यपदार्थ दिसत आहेत. ज्यामध्ये मिठाई सोबत समोसा आहे. दीपिकाने हेच पदार्थ खाल्ले आहेत. हा फोटो शेअर करताना तिने लिहिलंय की, ती सर्व काही खाते. मात्र, अभिनेत्रीचा फिटनेस पाहून लोकांचा यावर विश्वास बसत नाही. तंदुरुस्त राहण्यासाठी तिने एक युक्ती देखील शेअर केली आहे जी ती स्वतः अवलंबते.

दीपिका सर्व काही खाते पण ती संतुलित आहार पाळते. यासोबतच ती आपल्या आहारशैलीत सातत्य ठेवते. ती आपल्या शरीराची गरज काय आहे हे पाहते. तिने यात सातत्य ठेऊन त्यालाच आपली जीवनशैली बनवलं आहे. अभिनेत्री म्हणते की, तिने असा आहार कधीच स्वीकारला नाही जो ती सतत पाळू शकत नाही. मात्र, ती रोज जंक फूड किंवा जास्त गोड खात नाही. कारण तिचं असं म्हणणं आहे की, तुम्ही जे खाता ते तुमच्या त्वचेवर दिसून येते. त्यामुळे सर्वकाही काही मात्र अगदी प्रमाणात खा. शिवाय जोडीला व्यायामाची साथ ठेवा.