पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर पहिली प्रतिक्रिया दिली. जनता-जर्नादनाला नमन! मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडचे निवडणूक निकाल हे भारतातील जनतेचा विश्वास केवळ सुशासन आणि विकासाच्या राजकारणावर आहे, त्यांचा विश्वास भाजपवर आहे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान यांनी दिली. पंतप्रधान म्हणाले की, मी या सर्व राज्यातील कुटुंबातील सदस्यांचे, विशेषत: माता, भगिनी, मुली आणि आमच्या तरुण मतदारांचे भाजपवर प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. मी त्यांना खात्री देतो की आम्ही तुमच्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करत राहू.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये पुढे म्हटले की, “या निमित्ताने पक्षासाठी झटणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे विशेष आभार! तुम्ही सर्वांनी एक सुंदर उदाहरण सादर केले आहे. तुम्ही भाजपची विकास आणि गरीब कल्याणकारी धोरणे ज्या पद्धतीने लोकांमध्ये नेली त्याचे कौतुक करता येणार नाही. विकसित भारताचे ध्येय घेऊन आपण पुढे जात आहोत. आपल्याला थांबायचे नाही आणि खचून जायचे नाही. आपल्याला भारताला विजयी करायचा आहे. आज आपण एकत्रितपणे या दिशेने ठोस पाऊल उचलले असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, भाजपला पाठिंबा दिल्याबद्दल माझ्या प्रिय भगिनी आणि तेलंगणातील बांधवांचे आभार मानतो. गेल्या काही वर्षांत हा पाठिंबा वाढत आहे आणि भविष्यातही हाच ट्रेंड कायम राहणार आहे. तेलंगणाशी आमचे नाते अतूट असून आम्ही लोकांसाठी काम करत राहू. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचे मी कौतुक करतो.