Breaking News

पुन्हा दिसणार प्रिया बापट आणि मुक्त बर्वे एकत्र ! ; चला जाणून घेऊया या सिनेमाविषयी…

‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सीरिजच्या माध्यातून देशभरातली चाहत्यांची मने जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. तिच्या प्रत्येक चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. आता प्रिया मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबत दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या आगामी सिनेमाची उत्सुकता पाहायला मिळत आहे. चला जाणून घेऊया या सिनेमाविषयी…

प्रिया बापटच्या आगामी सिनेमाचे नाव ‘असंभव’ असे आहे. हा मराठी सिनेसृष्टीतील पहिला वहिला चित्रपट आहे ज्याचं शुटिंग नैनीतालमध्ये सुरु आहे. नैनीतालच्या ० ° आणि -३° सेल्सियस सारख्या गोठवणाऱ्या थंडीच्या वातावरणात या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

‘असंभव’ या चित्रपटाबद्दल आणखी एक खास बाब समोर आली आहे, ती म्हणजे मल्टी टॅलेंटेड अभिनेता, सचित पाटिल ‘साडे माडे तीन’ आणि ‘क्षणभर विश्रांती’ चित्रपटांनंतर आता ‘असंभव’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. यासोबत सचितनेच या सिनेमाची पटकथा देखील लिहिली आहे. एवढंच नाही तर या चित्रपटाच्या निमित्ताने सचित पाटिल निर्मिती क्षेत्रातही पदार्पण करतोय. या चित्रपटात सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट, संदीप कुलकर्णी आणि पुष्कर श्रोत्री दिसणार आहेत. २०१८ ला ‘आम्ही दोघी’ या चित्रपटनंतर आता पुन्हा एकदा मुक्ता बर्वे आणि प्रिया बापटचा अभिनय आपल्याला आगामी सिनेमा ‘असंभव’मध्ये अनुभवायला मिळणार आहे.

सध्या तरी सोशल मिडियावर प्रिया बापटच्या एन्ट्रीचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री ‘वो आगी वो आगी…’ असं म्हणत एक रोमाँन्टिक म्युझिक प्ले होत आणि प्रिया पळत जाऊन मुक्ताला मिठी मारताना दिसत आहे. त्यामुळे चित्रपटाची कथा ही चार पात्रांच्या भोवती फिरणार असल्याचे दिसत आहे. पण ही लव्हस्टोरी असणार की अजून काही हे चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *