पुण्यात विशाल अग्रवाल या बड्या उद्योगपतीच्या पोर्शो कारने दोन पादचाऱ्यांना दिलेल्या धडकेत मृत्यू झालाय. त्यात आरोपी अल्पवयीन असल्याने न्यायालयाने त्याची सुटका केली आहे. त्यामुळे हे प्रकरण चांगलच तापू लागलय. याशिवाय या प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी मध्यस्थी केल्याचे आरोप होऊ लागले आहेत. मात्र, सुनील टिंगरेंनी सर्व आरोप फेटाळले असून मला माझ्या प्रतिमेवर डाग लावण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सुनील टिंगरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीही सुनील टिंगरेंचे समर्थन केले आहे.
रुपाली ठोंबरे काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे पाटील यांनी सुनील टिंगरेंबाबत एक फेसबुक पोस्ट केली आहे. यामध्ये त्या लिहितात, पुण्यातील दोन तीन दिवसापूर्वी रात्री झालेला भीषण अपघात हा अत्यंत दुर्दैवीच होता,त्यात दोन जण मृत्युमुखी पडले हे अत्यंत भयान आणि धक्कादायक होते. मन सुन्न झाले,मृत्युमुखी पडलेल्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यात आमचा आमदार सुनील भाऊने कोणत्याही कायदेशीर कारवाईत हस्तक्षेप केला नाही. तसेच कुठलाही राजकीय दबाव आणलेला नाही. सोशल मीडियावर जाणून बुजून चुकीचे सांगून ट्रोल केले जात आहे, असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे.
सुनील भाऊ लोकांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता
पुढे रुपाली ठोंबरे लिहितात, हो अपघात झाल्यानंतर अपघात झालाय असा फोन आल्यानंतर आमदार सुनील भाऊ हे पोलीस स्टेशन मध्ये गेले होते. परंतु तोपर्यंत सदर प्रकार कोणताच माहिती नव्हता. आरोपीचे वडील हे परिचयाचे असून सुनील भाऊ आमदार असल्याने जनता, मतदार असतील कुटुंब असेल मित्रपरिवार असेल यांना जेव्हा जेव्हा अडचणीत फोन येतात त्यावेळेला सुनील आण्णा हे नेहमीच धावून जातो. परंतु या मदतीच्या वेळी अपघात झालेले प्रकरण हे पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर कळाले. सदर प्रकार हा समोर आला त्याचवेळी आमदार सुनील भाऊ यांनी जी काय कायदेशीर कारवाई असेल ती पोलिसांनी करावी असे सांगून तेथून बाहेर पडले. जर दबाब आणला असता तर त्या आरोपीवर गुन्हा दाखल झाला नसता. परंतु अपघाताची भीषण परिस्तिथी समजल्यावर पोलीस स्टेशन मधून माहिती घेवून बाहेर पडले. आमदार सुनील भाऊ टिंगरे यांच्या बद्दल जाणून बुजून चुकीचे पसरवले जात असून असा कोणताच कायदेशीर कारवाईत हस्तक्षेप, राजकीय दबाव आणलेला नाही. आणि आणू शकत नाही. आमदार सुनील भाऊ लोकांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता आहे आणि त्याने त्याचे काम कार्यरत ठेवावे ही विनंती आहे. सुनील भाऊ सत्य परेशान हो सकता है, पराजित नही, असं रुपाली ठोंबरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
‘प्यार जिंदगी है’ पुस्तकासाठी लेखिका अनिता पाध्ये यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार
https://kshitijonline.in/maharashtra-sahitya-parishad-award-to-writer-anita-padhye-for-the-book-pyaar-zindagi-hai/
जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; विक्रमादित्य सिंह यांच्यावर कंगना राणौतचा हल्लाबोल
https://kshitijonline.in/power-is-needed-to-eat-public-money-kangana-ranaut-attacked-vikramaditya-singh/
खून, निबंध आणि पापक्षालन ….
मद्यधुंद अवस्थेत, नंबर प्लेट नसलेले वाहन चालवताना दोन निर्दोष व्यक्तींचा खुन करणाऱ्या … होय खुनच करणाऱ्या (causing death by negligence ) धनदांडग्यांच्या मस्तवाल अल्पवयीन तरुणाला निबंध लिहिण्याची आणि १५ दिवस वाहतूक नियंत्रण करण्याची अट घालून जामिन मंजूर करणाऱ्या न्यायालयाच्या मेंदूला २१ तोफांची सलामी ….
इंडिया टुडेच्या एका बातमीनुसार पोलिस असे म्हणले की घडलेला गुन्हा गंभिर स्वरुपाचा नसल्याचे न्यायालयाला आढळल्यामुळे न्यालयाने जामिन मंजुर केला. आता वाहन परवाना नसताना दारू पिऊन, गाडी भरधाव वेगाने चालवून दोन अभियंत्यांचा खुन करण्याचा गुन्हा गंभीर नाही. मग गंभीरतेची व्याख्या काय आहे. धन्य ते न्यायालय. धन्य ती तपास यंत्रणा.
आता यात सर्वोत्तम कोण …. दोन लोकांचा मृत्यु झालाय हे दिसत असुन नियमांचे कातडे डोळ्यावर पांघरून बसलेली न्…